Miss Mexico 2021 : कोरोनाची लक्षणं दिसत असतानाही स्पर्धा रेटली, अर्ध्या स्पर्धकांना कोरोनाची लागण
Miss Mexico 2021 : काही स्पर्धकांना सर्दी आणि तापाची लक्षणं दिसत असतानाही त्यांनी कुठेही बोलू नये म्हणून दबाव टाकण्यात आला होता. टीमच्या एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याची माहितीही लपवण्यात आली होती.
Miss Mexico 2021 : गेल्या आठवड्यात पार पडलेल्या Miss Mexico 2021 स्पर्धेतील जवळपास अर्ध्या स्पर्धकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या स्पर्धकांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणं असतानाही त्याची वाच्यता कुठेही करु नये असा त्यांच्यावर दबाव आणला आणि स्पर्धा कायम सुरु ठेवण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या 32 पैकी 15 स्पर्धकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तसेच टीमच्या काही सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
'द गार्डियन' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांमध्ये ताप, कफ, खोकला आणि इतर कोरोनाची लक्षणं दिसत होती. त्याही परिस्थितीत या स्पर्धकांनी कोणतीही तक्रार करु नये असा दबाव त्यांच्यावर आणण्यात आला. मेक्सिको देशातील चिहूयाहुवा या शहरात गेल्या आठवड्यात ही स्पर्धा पार पडली.
Nearly half of Miss Mexico 2021 contestants test positive for COVID-19 https://t.co/9ILnhqr61m
— Insider News (@InsiderNews) July 7, 2021
ही स्पर्धा सुरु होण्याआधी सर्व स्पर्धकांनी आपण कोरोना निगेटिव्ह असल्याचं सर्टिफिकेट जमा केलं होतं. त्यानंतरच त्यांना स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळाली. पण या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणाऱ्या टीममधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आयोजकांनी लपवली असा आरोप आयोजकांवर केला जात आहे.
या स्पर्धकांसोबतच टीमच्या काही सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात असताना मिस मेक्सिको या स्पर्धेतील घडलेल्या या निष्काळजीपणाच्या घटनेवर आता अनेकांकडून टीका केली जात आहे. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटसोबत लॅम्बडा व्हेरिएंटचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे जगभरातील चिंतेत वाढ झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर मिस मेक्सिको या प्रख्यात स्पर्धेतील घटना ही धक्कादायक आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Khadse : प्रकृती अस्वास्थामुळे एकनाथ खडेंची पत्रकार परिषद रद्द झाल्याचं राष्ट्रवादीचं ट्वीट; ईडी चौकशीसाठी हजर राहणार?
- Petrol-Diesel Price Hike : जवळपास संपूर्ण देशात पेट्रोल शंभरीपार; डिझेलच्या दरांतही वाढ, जाणून घ्या, प्रमुख शहरांतील दर
- Lambda Variant : डेल्टा नंतर आता 'लॅम्बडा'चा धोका; डेल्टा प्लस पेक्षाही अधिक धोकादायक असण्याची शक्यता