एक्स्प्लोर

Mehul Choksi Arrest: मेहुल चौकसीला भारताच्या ताब्यात देण्याऐवजी अँटिगा-बार्बुडाला पाठवणार डोमिनिका सरकार

मेहुल चौकसी काही दिवसांपूर्वीच अँटिगा आणि बार्बुडा येथून फरार झाला होता. त्यानंतर इंटरपोलने त्याच्या विरोधात ‘यलो नोटीस’ जारी केली  होती. या नोटीसनंतर डोमिनिकामध्ये त्याला अटक करण्यात आली होती.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरेबियन बेटावरुन फरार झाला होता. त्याला  डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. डोमिनिका सरकार मेहुल चोकसीला भारताच्या ताब्यात देण्याऐवजी पुन्हा अँटिगा-बार्बुडा येथे पाठवणार आहे. अँटिगा-बार्बुलाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊनी यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे.

दरम्यान डोमिनिका येथील मेहुल चौक्सीचे वकील मार्श वेन यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, आज सकाळी पोलिस स्टेशनमध्ये मेहुलची भेट झाली. वकिलाच्या म्हणण्यानुसार, अपहरण करुन डोमेनिका येथे आणण्यात आले असा आरोप मेहुलने केला आहे. तसेच आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला आहे. मेहुल चौकसीला दिलासा मिळावा यासाठी त्याचे वकील न्यायालयात अपील दाखल करणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच मेहुल चौकसी अँटिगा आणि बार्बुडा येथून फरार झाला होता. त्यानंतर इंटरपोलने त्याच्या विरोधात ‘यलो नोटीस’ जारी केली  होती. या नोटीसनंतर डोमिनिकामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. बुधवारी मेहुलच्या अटकेच्या बातमीनंतर अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊनी म्हणाले की, मेहुल चोकसीला अँटिगाकडे न सोपवण्यास सांगितले आहे. मेहुलला भारतात पाठवण्याची गरज आहे. त्यामुळे त्याला भारताकडे देण्यास डोमिनिका सरकारला सांगितले आहे.

2018 साली जागतिक पोलीस संस्था इंटरपोलने जारी केलेल्या चोकसीविरोधात रेड नोटिसमुळे  जगातील कोठेही इमिग्रेशन पॉईंटमध्ये चोकसीने प्रवेश केल्यास त्यांना सतर्क केले जाईल. तसेच भारतीय एजेन्सींना संशय आहे की चोकसी क्युबा इथे आहे. कारण अँटिगाप्रमाणेच क्युबाचाही भारताशी प्रत्यर्पण करार नाही. मेहुल चोकसी हा भारतात प्रत्यार्पण रोखण्यासाठी दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढत आहे. त्याच्याकडे सध्या अँटिग्वानचे नागरिकत्व आहे. गेल्यावर्षी अँटिगाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन म्हणाले होते की चोकसीचे सर्व कायदेशीर पर्याय संपले की त्याचं नागरिकत्व रद्द केले जाईल.

चोकसीने याआधी असे म्हटलं होतं की, त्याच्यावरील आरोप खोटे, निराधार आणि राजकीय प्रयत्नांमुळे प्रेरित आहेत. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोकसी याचा पुतण्या नीरव मोदी याला अटक केली आहे. काका प्रमाणेच मोदीने ही 2018 मध्ये भारतातून पळ काढला होता आणि सध्या तो युनायटेड किंगडममध्ये आहे. नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचे प्रकरण ब्रिटिश सरकारने गेल्या महिन्यात मंजूर केले होते. तथापि मोदी अद्यापही या प्रत्यार्पणाच्या आदेशास यूके उच्च न्यायालयासमोर आव्हान देऊ शकतो. फेब्रुवारी 2019 मध्ये स्वाक्षरी केलेल्या आपल्या प्रत्यार्पणाच्या आदेशाविरोधात कोर्टात गेलेल्या विजय मल्ल्याच्या बाबतीतही या प्रक्रियेस काही महिने किंवा काही वर्षे लागू शकतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकालBeed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतलाMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Embed widget