एक्स्प्लोर

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरिबियन बेटावरुन बेपत्ता

मेहुल चोकसी रविवारी संध्याकाळी बेटाच्या दक्षिणेकडील भागातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आपल्या घराबाहेर पडला होता. तेव्हापासून तो दिसला नाही. त्या संध्याकाळी त्याला शेवटचं त्याच्या गाडीत पाहिलं गेलं होतं.

मुंबई : सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) 14,000 कोटी रुपयांच्या पीएनबी (पंजाब नॅशलन बँक) कर्जाचा घोटाळा आणि पैशांबाबत गैरव्यवहार प्रकरणात वॉंटेड असलेला फरार मेहुल चोकसी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरिबियन बेटावरुन बेपत्ता झाल्याची माहिती आता समोर येत आहे. चोकसीच्या कुटुंबियांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार ही दिली आहे. अँटिगा पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे तर भारतीय गुप्तचर एजेंसी यांना माहिती मिळाली आहे की चोकसी ॲंटिगामधून क्यूबा इथे पळून गेल्याच कळतंय. चोकसीचे वकील विजय अग्रवाल यांनी देखील त्यांचा क्लाईंट बेपत्ता आहे आणि त्याचे कुटुंब त्याच्या शोधात आहेत. 

पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये चोकसी रविवारी संध्याकाळी बेटाच्या दक्षिणेकडील भागातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आपल्या घराबाहेर पडला होता. तेव्हापासून तो दिसला नाही. त्या संध्याकाळी त्याला शेवटचं त्याच्या गाडीत पाहिलं गेलं होतं. परंतु अद्याप त्याची कोणतीही माहिती मिळत नाही. 23 मे रोजी जॉनसन पॉईंट पोलीस स्टेशनमध्ये मेहुल बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. सीबीआय सूत्रांनी माहिती दिली की चोकसी बेपत्ता असल्याची माहिती अधिकृतपणे त्यांना देण्यात आलेली नाही, परंतु अधिक माहितीसाठी ते भारतातील अँटिगा दूतावासाला पत्र लिहित आहेत. 

PNB Scam | मेहूल चोक्सीवर ईडीची मोठा करावाई; चोक्सीची 14 कोटी 45 लाखांची संपत्ती जप्त

2018 साली जागतिक पोलीस संस्था इंटरपोलने जारी केलेल्या चोकसीविरोधात रेड नोटिसमुळे  जगातील कोठेही इमिग्रेशन पॉईंटमध्ये चोकसीने प्रवेश केल्यास त्यांना सतर्क केले जाईल. तसेच भारतीय एजेन्सींना संशय आहे की चोकसी क्युबा इथे आहे. कारण अँटिगाप्रमाणेच क्युबाचाही भारताशी प्रत्यर्पण करार नाही. मेहुल चोकसी हा भारतात प्रत्यार्पण रोखण्यासाठी दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढत आहे. त्याच्याकडे सध्या अँटिग्वानचे नागरिकत्व आहे. गेल्यावर्षी अँटिगाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन म्हणाले होते की चोकसीचे सर्व कायदेशीर पर्याय संपले की त्याचं नागरिकत्व रद्द केले जाईल.

Nirav Modi Extradition | पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला लंडन कोर्टाची मंजुरी

चोकसीने याआधी असे म्हटलं होतं की त्याच्यावरील आरोप खोटे, निराधार आणि राजकीय प्रयत्नांमुळे प्रेरित आहेत. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोकसी याचा पुतण्या नीरव मोदी याला अटक केली आहे. काका प्रमाणेच मोदीने ही 2018 मध्ये भारतातून पळ काढला होता आणि सध्या तो युनायटेड किंगडममध्ये आहे. नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचे प्रकरण ब्रिटिश सरकारने गेल्या महिन्यात मंजूर केले होते. तथापि मोदी अद्यापही या प्रत्यार्पणाच्या आदेशास यूके उच्च न्यायालयासमोर आव्हान देऊ शकतो. फेब्रुवारी 2019 मध्ये स्वाक्षरी केलेल्या आपल्या प्रत्यार्पणाच्या आदेशाविरोधात कोर्टात गेलेल्या विजय मल्ल्याच्या बाबतीतही या प्रक्रियेस काही महिने किंवा काही वर्षे लागू शकतात.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget