एक्स्प्लोर

Zuckerberg Became Father : मार्क झुकरबर्ग यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं बाळाचं नाव

Mark Zuckerberg Child : मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. झुकरबर्ग यांनी फेसबुक फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

Mark Zuckerberg Became Father : फेसबुकची (Facebook) मूळ मालकी असलेली कंपनी मेटा (Meta)चे  सीईओ आणि संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. मार्क झुकरबर्ग पुन्हा एकदा बाबा झाले आहेत.  झुकरबर्ग यांची पत्नी प्रिसिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. झुकरबर्ग तिसऱ्यांदा पिता बनले आहे. झुकरबर्ग यांनी चिमुकल्या परीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी आपल्या मुलीचे नाव ऑरेलिया चॅन झुकरबर्ग (Aurelia Chan Zuckerberg) ठेवलं आहे.

मार्क झुकरबर्ग यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

मार्क झुकरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅनने एका गोंडस परीला जन्म दिला आहे. झुकरबर्ग यांनी फेसबुकवर सुंदर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ऑरिलिया चॅन झुकरबर्ग, जगामध्ये तुझं स्वागत आहे. खरंच तू देवाने दिलेला आशीर्वाद आहेस. मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिला यांचं हे तिसरं अपत्य आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mark Zuckerberg (@zuck)

मार्क झुकरबर्ग यांनी सप्टेंबर 2022 मध्ये सोशल मीडियावर पत्नी प्रेग्नेंट असल्याची माहिती दिली होती. त्यांनी पोस्ट करत सांगितलं होतं की, तो तिसऱ्यांदा बाप होणार आहे. मेटा सीईओने पत्नी प्रिसिला चॅन हिचा फोटो शेअर करताना ही गोड बातमी दिली होती. मे 2022 मध्ये मार्क झुकेरबर्ग आणि प्रिसिला यांनी लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या लग्नाच्या दिवसाचा फोटो शेअर करताना झुकेरबर्गने खास शुभेच्छा दिल्या होत्या.

सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं बाळाचं नाव

मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या नवजात मुलीचं नाव ऑरिलिया असं ठेवलं आहे. ऑरिलिया शब्दाचा अर्थ सोनेरी (Golden) असा आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी बाळाचं नाव ऑरिलिया ठेवल्याचं सांगितलं आहे.

कॉलेजमध्ये फुललं प्रेम

मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिला चॅन यांना आधील दोन मुली असून मोठ्या मुलीचं नाव मॅक्सिमा (7 वर्ष) आणि लहान मुलीचं नाव ऑगस्ट (5 वर्ष) आहे. मार्क झुकेरबर्ग आणि प्रिसिला कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. कॉलेजमध्येच त्यांचं प्रेम खुललं.  2003 मध्ये बीजे हार्वर्ड विद्यापीठात असताना ते एकमेकांना डेट करू लागले. 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Meta Layoffs : 'मेटा'मध्ये नोकरकपात सुरूच; 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget