एक्स्प्लोर

Meta Layoffs : 'मेटा'मध्ये नोकरकपात सुरूच; 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Meta Layoffs : अमेरिकेत आयटी क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याचे दिसून येत आहे. मेटा कंपनीने आता तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Meta Layoff :  फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या 'मेटा'ने पुन्हा एकदा नोकरकपात जाहीर केली आहे. दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या नोकरकपातीमध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार आहे. कंपनीने यापूर्वीच 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. 'मेटा' कंपनीचा सीईओ मार्क झुकेरबर्गने याबाबत आपल्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे.

कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये झुकेरबर्गने  'मेटा'मधून 10,000 कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याची माहिती दिली आहे. त्याशिवाय, कंपनीकडून 5 हजार जागांवर भरतीवर करण्यात येणार होती. आता ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे झुकेरबर्गने सांगितले आहे. 

मेटामध्ये सुरू असलेली ही नोकरकपात कंपनीमध्ये सुरू असलेल्या पुनर्रचनाशी निगडीत असल्याचे म्हटले जात आहे. कंपनी आपल्या संरचनेत मोठे बदल करत आहे. तसेच कमी प्राधान्याचे प्रोजेक्ट रद्द करत आहे. याशिवाय कंपनी नोकरभरतीही कमी करणार आहे. 'मेटा'मधून कर्मचारी कपातीच्या निर्णयासोबत व्यवस्थापनातील अनेक स्तर काढून टाकले आहे. मॅनेजर लेव्हलच्या अनेकांना आता वैयक्तिक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कंपनीत आता लवकरच नोकरभरती होईल अशी अपेक्षा नाही. त्यामुळे प्रत्येकाला अधिक योगदान द्यावे लागेल, असे झुकेरबर्गने म्हटले. 

मेटामधील 10,000 कर्मचार्‍यांच्या नोकरकपातीच्या वृत्तानंतर मेटाचे स्टॉक दर वधारले आहेत. प्री-मार्केट ओपनिंगमध्ये मेटाच्या शेअर दरात 2 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर मंदीचे सावट दिसून येत आहे. त्यातच मेटाचे तिमाही निकालदेखील असमाधानकारक असल्याचे दिसून आले. मेटाला जाहिरातीमधून मिळणारे उत्पन्नदेखील घटले असल्याचे स्पष्ट झाले होते. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये मेटाने 11,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. 2004 मध्ये फेसबुकच्या स्थापनेच्या 18 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीची कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. 

लेऑफ-ट्रॅकिंग साइट layoffs.fyi ने दिलेल्या माहितीनुसार, टेक उद्योगाने 2022 च्या सुरुवातीपासून जवळपास 2 लाख 90 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. त्यापैकी सुमारे 40 टक्के कर्मचाऱ्यांना या वर्षीच नोकरी गमवावी लागली आहे. 

ट्वीटरमध्ये ही कर्मचारी कपातीचा वरवंटा

ट्वीटर कंपनीने पुन्हा एकदा शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येच्या 10 टक्के असल्याचे सांगितले जात आहे. या कर्मचारी कपातात प्रॉडक्ट मॅनेजर, डेटा सायंटिस्ट आणि इंजिनिअर यांचा समावेश आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीने मोठ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. खर्चात कपातीचे कारण देत कंपनीने सुमारे 3,700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Varun Dhawan on Rohit Sharma : हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Om Birla vs K Suresh :लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी के सुरेश,ओम बिर्लांनी भरला अर्जNilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रियाRahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतीलABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Varun Dhawan on Rohit Sharma : हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
Embed widget