एक्स्प्लोर

Al-Qaeda Threat : ...तर आम्ही आमच्या मुलांच्या शरीरावर स्फोटके बांधू, अल-कायद्याच्या धमकीपत्रात खळबळजनक विधान

Al-Qaeda Threat : पत्रात दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, भाजपच्या प्रवक्त्यांनी टीव्हीवर इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आहे.

Al-Qaeda Threat : भाजप नेत्यांकडून प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून दहशतवादी संघटना अल-कायदाने (Al-Qaeda) भारतात आत्मघाती हल्ला करण्याची धमकी दिली आहे. याबाबत तसे पत्र आले आहे, या पत्रात दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, भाजपच्या प्रवक्त्यांनी टीव्हीवर इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आहे. त्यामुळे अल कायदा गुजरात, यूपी, बॉम्बे आणि दिल्लीत आत्मघातकी हल्ला करणार आहे. 6 जून रोजी आलेल्या धमकीच्या पत्रात AQIS ने इशारा दिला होता की, भगव्या दहशतवाद्यांनी आता अंत होण्याची वाट पाहा.

...तर आम्ही आमच्या मुलांच्या शरीरावर स्फोटके बांधू - Al-Qaeda

अल कायदा दहशतवादी संघटनेच्या पत्रात असं म्हटलंय की, आमच्या पैगंबराचा अपमान करणार्‍यांना आम्ही मारून टाकू, आमच्या प्रेषिताचा अपमान करणार्‍यांना उडवण्यासाठी आमच्या शरीरावर तसेच आमच्या मुलांच्या शरीरावर स्फोटके बांधू, या चुकीसाठी कोणतीही माफी, कोणतीही शांतता आणि सुरक्षितता त्यांना वाचवू शकणार नाही. 

"जगभरातील मुस्लिमांच्या हृदयात जखमा"
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर आणि त्यांच्या पत्नीवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर कारवाई करत भाजपने शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दुसरीकडे, इथे प्रत्येक धर्माचा पूर्ण आदर केला जातो, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, भाजप नेत्याने एका भारतीय टीव्ही चॅनेलवर पैगंबर आणि त्यांच्या पत्नीचा "अपमान आणि बदनामी" केली. या पत्रात दावा करण्यात आला आहे की जगभरातील मुस्लिमांच्या हृदयात जखमा झाल्या आहेत, तसेच ते आता सूडाच्या भावनांनी भरलेले आहेत.

नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात अल कायदाची उडी
भाजपने नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली. नवीन कुमार जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख होते. नुपूर शर्मा 27 मे रोजी एका खासगी वाहिनीच्या चर्चेत सहभागी झाल्यापासून हे प्रकरण सुरू झाले. यादरम्यान ज्ञानवापी मशिदीच्या वादावर चर्चा होत होती. पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. यादरम्यान नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांच्यावर काही कथित टिप्पणी केली होती. यानंतर नुपूर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्यावर पैगंबरांचा अपमान केल्याचा आरोप केला. यानंतर देशभरात भाजपविरोधात जोरदार निदर्शने झाली आणि नुपूर शर्माच्या अटकेची मागणीही जोर धरू लागली.

आखाती देशांमध्येही संताप

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर मुस्लिम देशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या टिप्पण्यांबाबत अनेक आखाती देशांनी अधिकृतपणे भारताकडे निषेध नोंदवला आहे. दुसरीकडे, कुवेत, कतार आणि इराणने रविवारी भारतीय राजदूतांना बोलावले होते. आखाती देशातील महत्त्वाच्या देशांनी या टिप्पण्यांचा निषेध करत तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com  वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

इतर महत्वाच्या बातम्या

Dhule : धुळ्यातील 'एलआयसी किंग'कडे सापडले कोट्यवधीचे घबाड; चार दिवसांपासून झाडाझडती 

Wardha: आर्वी पालिका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला 'गोल्ड'चा नाद, मोपेड वाहनाला बांधून विहिरीत फेकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget