South Korea : धक्कादायक! हॅलोविन फेस्टिवलमध्ये 50 जणांना हृदयविकाराचा झटका, 20 जणांचा चेंगरुन मृत्यू
उत्सव सुरु असतानाच अचानाक 50 जणांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
South Korea : दक्षिण कोरियाची राजधानी सेयूलमध्ये सध्या हॅलोविन फेस्टिवल सुरु आहे. नागरिक या उत्सवामध्ये जल्लोष आणि आनंदात होते. पण कोरियातील हा उत्सव दु:खात परिवर्तित झाला आहे. कारण उत्सव सुरु असतानाच चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी आहेत. याचवेळी येथे अचानाक 50 जणांना हृदयविकाराचा झटकाही आला आहे. जखमी रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी राष्ट्रपतींनी तातडीची बैठक बोलवली आहे.
दक्षिण कोरियातील योनहाप वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सेयूलमध्ये हॅलोविन पार्टीदरम्यान एका छोट्या रस्त्यावर अचानक गर्दी झाली. त्यावेळी तिथे चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला तर 100 जण जखमी झाले आहेत. येथील उपस्थित असणाऱ्यांचे हेल्पलाईनला आतापर्यंत 81 फोन आले आहेत. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यंसुक यलोन यांनी या घटनेची माहिती मिळताच तातडीची बैठक बोलवली आहे. त्यांनी आरोग्य कर्मचारी, अधिकारी आणि संबधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना केल्या आहेत. 400 आपतकालीन कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहेत.
South Korean officials said around 50 people were in cardiac arrest and a number feared dead after being crushed by a large crowd pushing forward on a narrow street during Halloween festivities in Seoul. https://t.co/NgM22cXnsL
— The Associated Press (@AP) October 29, 2022
दक्षिण कोरियातील सेयूलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हॅलोविन पार्टीदरम्यान येथे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जणांना हृदयविकाराचा झटका आला आहे. आपत्ती प्रतिसाद पथकाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार मोठ्या संख्येनं लोक जमा झाल्यानं बऱ्याच लोकांना श्वास घेण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळं ह्रदयविकाराचा धक्का बसण्यासारख्या समस्या निर्माण झाल्या. करोना संसर्गानंतर मोठ्या प्रमाणावर खुल्या पद्धतीनं नो मास्क हॅलोवीन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, या फेस्टिवलमध्ये तब्बल एक लाख लोक उपस्थित होते. त्याचवेळी एका छोट्या रस्त्यावर चेंगराचेंगरी झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला तर 100 जण जखमी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एकाच वेळी 50 जणांना हृदयविकाराचा झटका आला.
[Breaking] Nightmare in #Itaewon. Current status is that over 50 people have collapsed and possible multiple fatalities due to overcrowding during the Halloween festivities. Stay tuned for more info. pic.twitter.com/NhvVqnHlkl
— allkpop (@allkpop) October 29, 2022
एकाचवेळी 50 जणांना हृदयविकाराचा झटका आला. या सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत. सध्या या सर्वांना सीपीआर दिला जात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.