एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन यंदाची ‘मिस वर्ल्ड 2018’
![मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन यंदाची ‘मिस वर्ल्ड 2018’ Manushi Chhillar crowns Mexico’s Vanessa Ponce De Leon as Miss World 2018 मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन यंदाची ‘मिस वर्ल्ड 2018’](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/09120023/miss-world.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बिजींग : मेक्सिकोच्या वेनेसा पोन्स डी लिऑनने 'मिस वर्ल्ड 2018'चा किताब पटकावला आहे. गतविजेती मिस वर्ल्ड भारताची मानुषी चिल्लरने वेनेसा लिऑनला मिस वर्ल्डचा मुकूट घातला. पोन्स डी लिओनने हा किताब जिंकण्यासाठी सुमारे 118 सहभागींना पराभूत केले.
चीनच्या सान्या शहरामध्ये ही स्पर्धा रंगली होती. वेनेसा पोन्स डी लिऑन ही 68व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती स्पर्धक ठरली आहे. थायलँडची निकोलेन पिशापा ही मिस वर्ल्ड 2018ची उपविजेती ठरली आहे.
दरम्यान, यंदाची मिस इंडिया अनुकृती वासनेही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अनुकृतीने टॉप 30 मध्ये स्थान मिळवले. मात्र टॉप 12मध्ये प्रवेश करण्यात ती अयशस्वी झाली.
या स्पर्धेत भारत, चिली, फ्रान्स, बांगलादेश, जपान, मलेशिया, मॉरीशस, मेक्सिको, नेपाळ, न्यूझीलंड, सिंगापूर, थायलंड, युगांडा, अमेरिका, व्हेनेझुएला आणि व्हिएतनामच्या मॉडेल टॉप 30 मध्ये पोहोचल्या.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)