Grooming Gangs : लव्ह जिहाद ते ग्रुमिंग गँग्ज! पाकिस्तानी ग्रुमिंग गँग्जवर ब्रिटनच्या संसदेत चर्चा, हजारो मुलींवर बलात्कार केल्याचं समोर
Pakistani Grooming Gangs : धर्म आणि वर्ण या दृष्टिकोनातून लैंगिक हिंसाचार करणारे पाकिस्तानी वंशाचे टोळके ब्रिटनमध्ये कार्यरत असून त्यांनी हजारो मुलींना वासनेचे बळी बनवल्याचा दावा केला जात आहे.
मुंबई : भारतात लव्ह जिहादची चर्चा सुरू असतानाच इंग्लड आणि युरोपमध्ये ग्रुमिंग गँग्सची चर्चा सुरू झाली आहे. हॅरी पॉटरच्या लेखिका जे के रोलिंग आणि उद्योगपती इलॉन मस्क यांनी याबाबात चर्चा सुरु केली. धर्म, वर्ण या दृष्टिकोनातून लैंगिक हिंसाचार करणारे पाकिस्तानी वंशाचे टोळके, ज्याला ग्रुमिंग गँग्ज म्हटलं जातंय, ते ब्रिटनमध्ये कार्यरत असल्याचा दावा केला जातोय. हे ग्रुमिंग गँग्स म्हणजे नेमके काय, समजून घेऊया या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून.
लव्ह जिहाद ते ग्रुमिंग गँग्स… भारतात हिंदुत्ववाद्यांकडून केल्या जाणाऱ्या लव्ह जिहाद सारख्या चर्चा आता इंग्लंड आणि युरपियन देशातही रंगताना दिसताहेत. सहा वर्षांपूर्वी या विषयावर इंग्लडच्या संसदेतही चर्चा झाली होती. इंग्लडमधील खासदार लॉर्ड पिअरसन म्हणाले होते की, "गेल्या शतकात अडीच लाख ब्रिटिश मुलींवर बलात्कार झाले व त्यापैकी बहुतांशी बलात्कार हे मुस्लिम पुरुषांनी केले असे दिसून आले आहे. या मुलींना ओलीस ठेवून दिवसातून अनेक वेळा त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. जवळपास सर्व मुख्य शहरात या ग्रुमिंग गँग्स सक्रिय आहेत अशी माहितीचीफ कॉन्स्टेबलने दिली आहे. त्यावर सरकारचे उत्तर काय याची माहिती द्यावी."
इलॉन मस्कने केले पंतप्रधानांना लक्ष्य
गेल्या दोन दिवसांपासून इलॉन मस्क आणि लेखिका जे के रॉलिंग यांनी याविषयी समाज माध्यमात इंग्लडचे विद्यमान पंतप्रधान कीर स्टार्मर यांना लक्ष केले आहे. X वर पोस्ट करताना, मस्कने ग्रुमिंग गँग्सचा रेप गँग्स म्हणून उल्लेख केला. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "यूकेमध्ये बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी संशयितांवर आरोप ठेवण्यासाठी पोलिसांना क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसची परवानगी आवश्यक आहे. ज्या वेळी बलात्कार करणाऱ्या टोळ्या लहान मुलींना आपलं लक्ष्य बनवत होत्या त्यावेळी पीएसचा प्रमुख कोण होतं?"
प्रसिद्ध लेखिका जे.के. रोलिंग यांनीही यावर मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या की, "त्यांना ग्रुमिंग गँग का म्हणतात? रॉदरहॅममधील मुलींवर बलात्कार करणाऱ्या टोळ्यांनी काय केले याचे जे तपशील समोर आले आहेत ते अतिशय भयानक आहेत. या प्रकरणात पोलिसांवर होणाऱ्या भ्रष्टाचाराचे आरोप जवळजवळ अविश्वसनीय आहेत."
या सर्व चर्चेला कारणीभूत ठरले आहेत इंग्लडच्या मजूर पक्षाचे माजी खासदार सायमन डँक्झुक. सायमन डॅनझुक यांनी सांगितलं की, मी स्वतः तीन वर्षे लैगिक छळवणुकीच्या प्रकरणाविरोधात मोहीम चालवली होती. त्यावेळी आरोपींच्या धर्माविषयी उल्लेख केला जाऊ नये अन्यथा आपल्याला मुस्लिम मतं गमवावी लागतील असा इशारा माझ्या पक्षातील वरिष्ठांनी दिला होता. माझ्या पक्षाच्या तत्कालीन अध्यक्षांनी मला रोखले होते. माझ्या मतदारसंघात ग्रुमिंग गँग्सकडून चालवलेले लैगिक छळवणुकीचे प्रकरण 2012 साली उघडकीस आले होते. माझ्यासाठी तो प्रकार नवीन नव्हता. मी ताबडतोब यातील वंशकिता आणि धर्माशी संबंधित मुद्दा उपस्थित केला होता. मी तीन वर्षे याप्रकरणी मोहीम चालवली.
ग्रुमिंग गँग्स म्हणजे काय?
- धर्म, वर्ण या दृष्टिकोनातून लैंगिक हिंसाचार करणारे टोळके.
- अल्पवयीन मुलींना टारगेट करणे याचं काम आहे.
- त्या माध्यमातून लैंगिक उपभोग घेण्यासाठी संघटित प्रयत्न केला जातो.
- ड्रग्स, अमली पदार्थांचा वापर करणे.
ही बातमी वाचा: