(Source: ECI/ABP News/ABP Majha)
किंग चार्ल्स यांनी ऋषी सुनक यांची ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून केली नियुक्ती, सरकार स्थापनेसाठी केले आमंत्रित
Rishi Sunak New Britain PM: किंग चार्ल्स तृतीय यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नवे नेते ऋषी सुनक यांची नियुक्ती केली आहे.
Rishi Sunak New Britain PM: किंग चार्ल्स तृतीय यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नवे नेते ऋषी सुनक यांची नियुक्ती केली आहे. ऋषी सुनक यांनी मंगळवारी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतली. किंग चार्ल्स यांनी त्यांना देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आणि त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री सुनक हे भारतीय वंशाचे असून ते गेल्या 210 वर्षांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत.
Rishi Sunak appointed new British PM by King Charles III
— ANI Digital (@ani_digital) October 25, 2022
Read @ANI Story | https://t.co/sT38pzl3j7#RishiSunak #UK #UnitedKingdom #KingCharlesIII pic.twitter.com/Cx7WxoXK0D
किंग चार्ल्स यांच्या भेटीनंतर ऋषी सुनक यांनी 10 डाउनिंग स्ट्रीटवरील आपल्या पहिल्या भाषणात सांगितले की, चुका सुधारण्यासाठी माझी निवड करण्यात आली आहे. मी तुमची नम्रतेने सेवा करण्याचे वचन देतो आणि ब्रिटनच्या लोकांची सेवा करत राहीन. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो. आपण सर्व मिळून चांगले भविष्य घडवू.
ऋषी सुनक म्हणाले की, हे सरकार प्रामाणिकपणा, व्यावसायिकता आणि प्रत्येक स्तरावर जबाबदारीचे असेल. मी तुमचा विश्वास कमावला आहे आणि तो मी कायम राखीन. ब्रिटन हा महान देश आहे, पण देशासमोर गंभीर आर्थिक आव्हान आहेत, यात शंका नाही. पुढे कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. सध्या आपला देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
दरम्यान, मंगळवारी लिझ ट्रस यांनी किंग चार्ल्स यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. लिझ ट्रस यांनी केवळ 45 दिवसातच (20 ऑक्टोबर) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ऋषी सुनक हे सोमवारी (24 ऑक्टोबर) कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बनले. त्यांच्या प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंट टोरी खासदारांकडून पुरेसा पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरला. यातच युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची आर्थिक विश्वासार्हता कमी करणारी अर्थसंकल्पीय तूट यासारख्या समस्यांशी ब्रिटनने ग्रासले आहे. अशा परिस्थितीत सुनक यांनी देशाची सत्ता हाती घेतली.
संबंधित बातमी: