(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rishi Sunak : कॉलेजमधल्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर, बंगळूरूमध्ये लग्नगाठ, ऋषी सुनक यांची फिल्मी लव्हस्टोरी
Britain New Prime Minister : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि अक्षता मूर्ती (Akshata Murty) यांची लव्ह स्टोरीही अगदी फिल्मी स्टाईल आहे.
Britain New Prime Minister : भारतीय वंशाचे (Indian Origin) ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी (UK New PM) निवड झाली आहे. लवकरच ऋषी सुनक पंतप्रधानपदाची (Britain PM) शपथ घेणार आहेत. पहिल्यांदाच भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. भारताचे जावई ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. ऋषी सुनक यांनी रविवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत विजय मिळवला. भारतीय म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणारे ते पहिले भारतीय आहेत.
ऋषी सुनक भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे आजोबा पंजाबचे होते. ऋषी यांची पत्नी अक्षता मूर्ती देखील भारतीय आहे. अक्षताचे वडील एन नारायण मूर्ती हे देशातील मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी इन्फोसिस या आयटी कंपनीची स्थापना केली होती.
ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि अक्षता मूर्ती (Akshata Murty) यांची लव्हस्टोरीही अगदी फिल्मी स्टाईल आहे. ऋषी सुनक आणि अक्षता यांच्या कॉलेजमध्ये झाली.
कोण आहेत ऋषी सुनक?
ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे होते. पण त्याचं कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आले होते. तीन भावंडांपैकी ते मोठे आहेत. त्यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. स्टॅनफोर्ड विद्यापीठातीन एमएचं शिक्षण घेतलं. ऋषी सुनक इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. नारायण मूर्तीं यांची मुलगी अक्षतासोबत सुनक यांनी लग्न केले आहे. ऋषी यांना दोन मुली आहेत.
कॉलेजमध्ये सुरु झाली अक्षता आणि ऋषी सुनक यांची प्रेमकहाणी
ऋषी सुनक यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इंग्लंडमधील 'विंचेस्टर कॉलेज'मधून केले. त्यांनी पुढील शिक्षण ऑक्सफर्डमधून केले. 2006 मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवीही मिळवली. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएच्या शिक्षण घेत असताना ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांची भेट झाली. अक्षता आणि ऋषी यांचे एकमेकांवर प्रेम जडलं. 2009 मध्ये दोघांनी बंगळुरूमध्ये भारतीय परंपरेनुसार लग्न केलं. इंग्लंडमध्ये अक्षता यांचा स्वतःचा फॅशन ब्रँड आहे. अक्षता या इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. सुनक दाम्पत्याला कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.
ऋषी सुनक यांचा आतापर्यंतचा प्रवास
- ऋषी सुनक यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. त्यांचे आईवडील भारतीय वंशाचे होते.
- 1960 मध्ये त्यांचं कुटुंब आफ्रिकेमध्ये वास्तव्यास होतं.
- त्यानंतर त्यांचं कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आलं.
- सुनक यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं.
- स्टॅनफोर्ड विद्यापीठातून MA पदवी शिक्षण
- ऋषी सुनक इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
- नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत त्यांनी लग्न केलं आहे.
- ऋषी सुनक 2015 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले.
- ऋषी सुनक यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांनी कोरोनाच्या चांगलं काम केलं आहे.
- कोरोनाच्या काळात ऋषी सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं.
- सुनक यांनी बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पाहिली होती.