Karachi Blast: पाकिस्तानच्या कराचीमध्ये भीषण स्फोट; 10 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
Karachi Blast: या घटनेची माहितीची मिळताच पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Karachi Blast: पाकिस्तानच्या कराचीमधील शेरशाह पराचा चौक परिसरातील एका इमारतीत आज (शनिवार) भीषण स्फोट झालाय. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहितीची मिळताच पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा स्फोट नेमका कशामुळं झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ माजलीय.
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात घेऊन जात आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. हा स्फोट नेमका कशामुळं झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. बॉम्ब डिस्पोजल युनिट (BDU) स्फोटाच्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून बचावकार्य सुरू आहे.
एएनआयचं ट्वीट-
एसएचओ जफर अली शाह यांनी सांगितले की, हा स्फोट बँकेच्या खाली असलेल्या नाल्यात झाला. इमारतीखालील नाल्यात वायू साचल्यामुळं हा स्फोट झाल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. नाला साफ करता यावा यासाठी बँकेला जागा रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या स्फोटात जवळच्या पेट्रोल पंपाचेही नुकसान झालंय. त्याचबरोबर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याचं वृत्त आहे. तसेच या स्फोटातील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-