US Inauguration Day 2021 : कमला हॅरिस यांनी घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची शपथ
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला, भारतीय वंशाची व्यक्ती आहेत.
वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला, भारतीय वंशाची व्यक्ती आहेत. कमला हॅरिस यांच्यासोबत त्याचे पती डाऊग एम्हॉफ देखील शपथविधी सोहळ्याला हजर होते. कमला हॅरिस अमेरिकेच्या 45 व्या उपराष्ट्रपती ठरल्या आहे.
'महिला ओबामा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॅरिस पहिल्यांदाच सिनेट सदस्या झाल्या आहेत. नोव्हेंबरमधील विजयानंतरच्या ऐतिहासिक भाषणात हॅरिस यांनी आपल्या दिवंगत आई श्यामला गोपालन, भारतातील कर्करोगाच्या संशोधक आणि भारतातील नागरी हक्क कार्यकर्त्या यांची आठवण करुन देताना म्हटलं की, आईने आपल्या राजकीय कारकीर्दीच्या या मोठ्या दिवसासाठी तयार केले. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाची धुरा सांभाळणारी पहिली महिला असू शकते, मात्र तू शेवटची असणार नाहीस, असंही आईने म्हटलं होतं.
कमला हॅरिस सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नी बनणाऱ्या त्या पहिल्या महिला, पहिल्या भारतीय वंशाच्या आणि पहिल्या आफ्रिकन अमेरिकन आहेत. ऑगस्ट महिन्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेले जो बायडन यांनी हॅरिस यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडले होते. हॅरिस एकेकाळी बायडन यांच्या प्रखर टीकाकार होत्या. 56 वर्षीय हॅरिस या आशियाई अमेरिकन तीन सिनेट सदस्यांपैकी एक आहेत.
अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीबाबतच्या रंजक गोष्टी
कमला हॅरिस यांची ओळख
कमला हॅरिस यांची आई भारतीय आणि वडिल जमेकाई वंशाचे आहेत. त्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकन आहेत. कमला हॅरिस यांचा जन्म 1964 मध्ये ऑकलँडमध्ये भारतीय वंशाच्या श्यामला गोपालन हॅरिस आणि जमेकाई वंशाचे वडिल डोनाल्ड हॅरिस यांच्या घरी झाला. त्यांचे वडिल स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते आणि आई स्तन कॅन्सर या विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधक होत्या. कमला हॅरिस यांच्या वडिलंपासून विभक्त झाल्यानंतर कमला यांच्या आईनेच त्यांचा सांभाळ केला. त्यामुळे त्या आपल्या आईसोबत भारतात येत असतं.
हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतात झाला आहे. त्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या आणि तिकडेच स्थायिक झाल्या. कमला यांना घेऊन त्या नेहमी आपल्या कुटुंबाला भेटायला भारतात यायच्या. कमला यांचे आजोबा पी.व्ही. गोपालन हे नंतरच्या काळात चेन्नईला स्थायिक झाले. आपण पाच वर्षाचे असताना आजोबांसोबत थुलसेद्रपूरम या मूळ गावी फेरफटका मारल्याचे कमला यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन सांगितले होते.
आपल्या आई-वडिलांप्रमाणेच कमला हॅरिसही उच्चशिक्षित आहेत. त्यांनी 1998 मध्ये ब्राउन युनिवर्सिटीमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया युनिवर्सिटीमधून कायद्याची पदवी मिळवली. तसेच त्यानंतर त्यांनी फ्रांसिस्को डिस्ट्रिक्ट अटॉर्नी ऑफिस जॉईन केलं. जिथे त्यांना करियर क्रिमिनल यूनिटचं इंचार्ज केलं होतं.