एक्स्प्लोर
Advertisement
सर्जिकल स्ट्राईक काय असतात आम्ही दाखवू, हाफिज सईदची दर्पोक्ती
इस्लामाबाद : उरी हल्ल्याचा भारतीय सैन्याने वचपा काढल्यानंतर काल पाकिस्तानमधला जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदने पुन्हा एकदा गरळ ओकली. उरी हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याने तिळपापड झालेल्या सईदने सर्जिकल स्ट्राईक काय असतात, हे आम्ही भारताला दाखवू अशी धमकी दिली आहे.
शुक्रवारी फैसलाबादमध्ये सईदच्या सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्याने भारताला धमकी देताना भारतीय माध्यमांवरही आगपाखड केली. तो म्हणाला की, " उरी हल्ल्यानंतर भारतीय माध्यमांनी केवळ त्यांचे 20च जवान मारले गेल्याचा दावा केला. पण हे साफ खोटं आहे. या हल्ल्यात 177 हून अधिक भारतीय ठार झाले आणि इतर अनेकजण जखमी झाले. आमच्यावर सूड उगवण्यासाठी एक झलक दाखवण्यात आली. यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. पण आम्ही सर्जिकल स्ट्राईक कशाला म्हणतात, हे भारताला दाखवून देऊ असं तो म्हणाला. यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनाही लक्ष्य केलं.
काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांच्या 71 व्या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्व देशांच्या प्रतिनिधींच्या साक्षीने पाकिस्तानला दरडावलं होतं. दहशतवादाला पोसणाऱ्या देशांना वाळीत टाकण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. तसंच भडकवणारी भाषणं करुन काश्मीर बळकावण्याची स्वप्न पाहू नका असा इशाराही पाकिस्तानी पंतप्रधानांसोबत सईदसारख्या दहशतवाद्यांना दिला होता.
तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांनी हाफीज सईदला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेलं आहे. तरीही त्याच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी पाकिस्तान सरकारने त्याला मोकळं रान दिलंय. त्यामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिशी घालत असल्याचं ढळढळीत सत्य पुन्हा जगासमोर आलं.
संबंधित बातम्या
सार्क परिषद पुढे ढकलली, पाकला एकटं पाडण्यात भारताला यश!
दहशतवाद्यांचे मृतदेह दफन, पुरावे नष्ट करण्याचे पाकचे प्रयत्न
होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात
वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द
पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना पाक परराष्ट्र मंत्रालयाचं बोलावणंJamaat ud Dawa
मोदी आणि भारतीय जवानांकडून पितृपक्षात पाकचं श्राद्ध : राज ठाकरे
सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले?
भारत-पाक युद्ध झाल्यास… दोन्ही देशांची शस्त्रसज्जता किती?
ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना
भारत कणखर, मोदींचा अभिमान, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट
अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन
काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष
फोटो : भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार
फोटो : सर्जिकल स्ट्राईक: असा घेतला उरीचा हल्ल्याचा बदला!
फोटो : भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्जः डीजीएमओ
सर्जिकल स्ट्राईक: डोग्रा आणि बिहार रेजिमेंटने बदला घेतला !
काश्मीर बळकावण्याचं स्वप्न पाहू नका, स्वराज यांनी पाकला खडसावलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement