एक्स्प्लोर
इस्रोची उद्या अग्नीपरिक्षा, 20 उपग्रह अंतराळात पाठवणार
मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (इस्रो) च्य़ा चेन्नईपासून ८० किलोमीटर दूर आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटामधील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून पीएसएलवीसी ३४ हे यान 'कारटो सॅट २' या भारताच्या महत्त्वपूर्ण उपग्रहासोबत एकूण २० उपग्रह घेऊन बुधवारी अंतराळात झेपावणार आहे.
भारताचे पीएसएलवीसी ३४ जेव्हा अंतराळात झेपावेल, तेव्हा जगाच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात देशाचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल.
पृथ्वीच्या देखरेखीसाठी 'कारटो सॅट २' या यानासोबत १९ उपग्रहांना घेऊन हे यान अंतराळात झेपावणार आहे. 'पीएसएलवीसी ३४' चे सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरील दुसऱ्या लाँच पॅडवरून बुधवारी सकाळी ९ वाजून २६ मिनीटांनी अंतराळात झेपावणार आहे.
३२० वजन असलेले 'पीएसएलवी ३४' कॅनेडा, इंडोनेशिया, जर्मनी आणि अमेरिकेचे एकूण 17 उपग्रहांना घेऊन जाणार आहे. या उपग्रहातील ७२७.५ किलोग्रॅम वजनाचे 'कारटो सॅट 2' हे मुख्य यान आहे. जे पृथ्वीच्या देखरेखीसाठी पाठवण्यात येत आहे. हे यान अंतराळातून पृथ्वीच्या हालचालीचे फोटो काढून पाठवणार आहे. यासोबतच भारताचे 'सत्यभामा सॅट' आणि 'स्वयं' हे उपग्रहही अंतराळात पाठवण्यात येणार आहेत.
इस्रो अमेरिकेचे १३ उपग्रह अंतराळात पाठवणार असून यात गूगलच्या टोरा बेला या कंपनीने पृथ्वीच्य़ा हलचालींचे फोटो टिपण्य़ासाठी बनवलेला स्काय सॅट जेन२ हा ११० किलोग्रॅमचा उपग्रहही आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement