Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धाचा आगडोंब! IDF कडून गाझा पट्टीवर हल्ले कायम, 15 रुग्णालये नेस्तानाभूत
Israel Palestine War : इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासने ताब्यात घेतलेल्या 240 हून अधिक ओलिसांपैकी काही जणांची सुटका केल्यास युद्धविराम देण्याचं नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे.
Israel Gaza War : इस्रायल (Israel) चे गाझा पट्टी (Gaza Strip) तील हल्ले सुरुच आहेत. इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यातील युद्धाला महिना उलटून गेला आहे. हमास गाझा पट्टीत रुग्णालयांच्या खालून भूमिगतरित्या दहशतवादी कारवाया करत असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. त्यामुळे इस्रायली लष्कराने गाझातील रुग्णालयावर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. इस्रायली सैन्याने गाझातील 15 रुग्णालयांवर हल्ला करत ते नेस्तानाभूत केल्याचा दावा केला आहे.
आतापर्यंत 12 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू
7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर 5000 रॉकेट डागले आणि या युद्घाला तोंड फुटलं. मात्र, या दोन्हींमधील संघर्ष निवळण्याची चिन्हे अद्याप धूसर आहेत. या युद्धात आतापर्यंत 12 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
गाझामधील सुरक्षेची जबाबदारी इस्रायलची
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, हमासबरोबरच्या युद्धानंतर अनिश्चित काळासाठी गाझामध्ये 'संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी' इस्रायलची असेल, हे स्पष्ट केलं आहे. इस्रायलने सुमारे 2.3 दशलक्ष पॅलेस्टिनींचे निवासस्थान असलेल्या किनारपट्टीवरील एन्क्लेव्हवर नियंत्रण राखण्याची योजना आखली आहे.
It's been a month since the October 7 Massacre. While the world might have moved on, we don't have that privilege.
— Israel Defense Forces (@IDF) November 7, 2023
Hamas started this war—yet it's a war we must fight. A war we must win. pic.twitter.com/LkmCyhbe8R
इस्रायलचा तिन्ही मार्गांनी हमासवर हल्ला
सोमवारी उशिरा प्रसारित झालेल्या एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी युद्धाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासने ताब्यात घेतलेल्या 240 हून अधिक ओलिसांपैकी काही जणांची सुटका केल्यास युद्धविराम देण्याचं नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे.
इस्रायलच्या संरक्षण दलांनीही मोठ्या प्रमाणावर भू-आक्रमणाची योजना आखली आहे. इस्रायल लष्कराचे रणगाडे, चिलखती वाहने आणि सैन्य गाझामध्ये जमिनीवर हल्ले करत आहेत. युनायटेड नेशन्ससह जगातील अनेक देश आणि एजन्सी युद्ध थांबवण्यासाठी आवाहन करत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे की, हमासने ओलिस ठेवलेल्या सर्व इस्रायली नागरिकांना सोडल्याशिवाय युद्धविराम होणार नाही. तर, इस्रायलच्या तुरुंगात बंद असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात ओलिसांना सोडण्याची अट हमासने ठेवली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Israel Hamas War : इस्रायल-हमास संघर्षाचा एक महिना! युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू