एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अबू अल बगदादी जिवंत, पाच वर्षांनी डोकं वर, श्रीलंका स्फोटांची जबाबदारीही स्वीकारली
सीरियातील आयसिसच्या तळांना नष्ट केल्याचा सूड उगवण्यासाठी श्रीलंकेतील स्फोट घडवल्याचं बगदादीने व्हिडिओमध्ये केला आहे. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी आधीच स्वीकारली होती.
मुंबई : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी जिवंत आहे. बगदादीने तब्बल पाच वर्षांनंतर व्हिडिओ जारी करत जिवंत असल्याचा पुरावा दिला आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारीही बगदादीने स्वीकारली आहे.
अमेरिकेने सीरियातल्या स्फोटात बगदादीचा खात्मा केल्याचा दावा केला होता. मात्र बगदादी नावाची डोकेदुखी सहजासहजी संपताना दिसत नाही. जितक्या वेळा बगदादीचा खात्मा झाल्याच्या बातम्या येतात, तितक्याच वेळा तो पुन्हा डोकं वर काढून थयथयाट घालतानाही दिसतो.
दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेचा मोठा निर्णय, चेहरा झाकणाऱ्या सर्व कपड्यांवर बंदी
सीरियातील आयसिसच्या तळांना नष्ट केल्याचा सूड उगवण्यासाठी श्रीलंकेतील स्फोट घडवल्याचं बगदादीने व्हिडिओमध्ये केला आहे. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी आधीच स्वीकारली होती. श्रीलंकेत ईस्टर सण्डेला चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. स्फोटात 500 नागरिक जखमी झाले होते. श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित बातम्याश्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी आयसिसने स्वीकारली
श्रीलंकेत आज रात्रीपासून आणीबाणी लागू होणार, राष्ट्रपतींची घोषणा
श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात 35 परदेशी नागरिक मृत, सर्व भारतीय सुरक्षित, मृतांचा आकडा 207 पार
श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला, सहा भारतीयांसह 290 जणांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
करमणूक
राजकारण
Advertisement