एक्स्प्लोर

 ISIS Chief Dead: ISIS प्रमुख प्रमुख अबु हुसेन कुरेशीचा खात्मा, तुर्कीच्या गुप्तचर संघटनांची कामगिरी

 ISIS Chief Dead: तुर्की सैन्याने सीरियामध्ये (Syria) गुप्तचर मोहीम राबवताना ISIS प्रमुख अबू हुसैन अल-कुरेशीचा खात्मा केला आहे.

ISIS Chief Dead: संपूर्ण जगभरात दहशतवाद ही खूप मोठी समस्या आहे. प्रत्येक देश दहशतवाद संपण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. परंतु दहशतवादाचे पसरलेले मोठे जाळे पाहता संपूर्ण जगाला एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मोठं यश आलं आहे. ISIS प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी याला इराकी सैन्याने ठार केले आहे. तुर्कस्तानने सीरियाच्या हद्दीत घुसून ही कारवाई केली आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी रविवारी (30 एप्रिल) रोजी ही माहिती दिली. एर्दोगन म्हणाले की, 'गुप्तचर संस्था दीर्घकाळापासून ISIS प्रमुखाचा पाठलाग करत होत्या'. एर्दोगन यांनी तुर्कीच्या प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, 'अल-कुरेशी तुर्कीच्या राष्ट्रीय गुप्तचर संघटनेने केलेल्या कारवाईत सीरियामध्ये मारला गेला.'

अबू हुसेन अल-हुसेनी अल-कुरेशी याला अबू हुसेन अल-कुरैशी म्हणून ओळखले जात होते. ISIS चा आधीचा प्रमुख दक्षिण सीरियातील एका कारवाईत मारला गेल्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये ISIS ने अल-कुरेशीची प्रमुख म्हणून निवड केली. त्यानंतर आता सहा महिन्यांत जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाचा खात्मा करण्यात आला आहे. 

सीरियाच्या संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या सैन्य दलाची ही कारवाई उत्तर सीरियातील जंदारी शहरात झाली आहे. हे शहर सीरियामधील तुर्की समर्थक बंडखोर गटांच्या ताब्यात आहे. 6 फेब्रुवारी रोजी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपात या शहराचे बरेच नुकसान झाले होते. 

मध्यरात्री केली कामगिरी

मात्र सीरिया सैन्याने अद्याप या कारवाईबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री ही कारवाई सुरू झाली. यादरम्यान तासभर जोरदार गोळीबार झाला आणि त्यानंतर मोठा स्फोट देखील झाला. तेथे कोणी येऊ नये म्हणून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता.

ISISची बऱ्याच वर्षांपासून दहशत 

ISISने 2014 मध्ये आपली दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. तेव्हा इराक आणि सीरियातील विस्तीर्ण भागांवर त्यांनी कब्जा केला. त्यावेळी त्याचा प्रमुख अबू बकर अल-बगदादी याने संपूर्ण प्रदेशात इस्लामिक खिलाफत घोषित केली होती. त्यानंतर, सीरिया आणि इराकमधील अमेरिकन-समर्थित सैन्याने तसेच इराण, रशिया आणि विविध निमलष्करी दलांसह सीरियन सैन्याने केलेल्या कारवाईमुळे ISISने या प्रदेशावरील आपली पकड गमावली.

अलिकडच्या काळात ISISचे अनेक दहशतवादी देशाच्या अनेक भागांत बऱ्याच काळापासून लपून राहत आहेत. त्यांचा हा प्रमुख जरी मारला गेला असेल तरी त्यांच्याकडून नवा म्होरक्या लगेच समोर येतो. त्यामुळे त्यांचा फक्त प्रमुखच नाही तर ही दहशतवादी संघटना संपवणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी देशातील अनेक गुप्तचर यंत्रणा काम करत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Four Day Workingweek: 2023 मध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट? आता आठवड्यातून फक्त चार दिवसच काम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget