एक्स्प्लोर

Alireza Tangsiri : होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणारा इराणचा नौदल प्रमुख ठार, इस्त्रायलचा मोठा दावा

Israel Iran Conflict :  अलीरेझा तंगसिरी हे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) नौदल विंगचे प्रमुख होते आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या रणनीतीवर देखरेख करत होते.

Israel Iran War : पश्चिम आशियात सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण-इस्रायल युद्धात मोठा दावा समोर आला आहे. इस्रायलच्या एका अधिकाऱ्याने इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) नौदल प्रमुख अलीरेझा तंगसिरी (Alireza Tangsiri) यांच्या मृत्यूचा दावा केला आहे. दक्षिण इराणमधील बंदर अब्बास येथे झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितलं जात आहे. या घटनेमुळे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि ऊर्जा पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

Iran Navy Hormuz Strait : होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाला धक्का?

इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते, तंगसिरी हे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) नौदल विंगचे प्रमुख होते आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या रणनीतीवर देखरेख करत होते. या सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणावर तेल आणि वायू वाहतूक होते. त्यामुळे या भागातील कोणतीही हालचाल जागतिक ऊर्जा बाजारावर थेट परिणाम करते.

जर हा दावा खरा ठरला, तर इराणच्या लष्करी नेतृत्वासाठी हा मोठा धक्का मानला जाईल. विशेषतः फारसच्या आखातातील त्यांची रणनीतिक पकड कमकुवत होण्याची शक्यता आहे.

Alireza Tangsiri Profile : कोण होते अलीरेझा तंगसिरी?

अलीरेझा तंगसिरी यांचा जन्म इराणच्या बुशेहर प्रांतात झाला होता. त्यांनी इराण-इराक युद्धादरम्यान सेवा बजावली होती. त्यानंतर IRGC नौदलात त्यांनी विविध पदांवर काम करत प्रगती केली. बंदर अब्बासमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती आणि पुढे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली.

Iran Israel War Escalation : युद्धात वाढते नुकसान

28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षानंतर अनेक वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांच्या मृत्यूचे दावे करण्यात आले आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईमुळे इराणच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वावर मोठा दबाव वाढला आहे.

Global Impact : जागतिक स्तरावर परिणाम

या युद्धाचा परिणाम केवळ मध्यपूर्वेतच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही होत आहे. ऊर्जा पुरवठा, तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय स्थैर्य यावर याचे परिणाम दिसून येत आहेत. हॉर्मुझची सामुद्रधुनी अद्यापही इराणच्या नियंत्रणाखाली असून त्यामुळे कच्च्या तेलाचा जागतिक व्यापार बऱ्यापैकी ठप्प झाल्याची स्थिती आहे. आता अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यासंबंधी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget