एक्स्प्लोर
Advertisement
मानवी शरीरातील सर्वात मोठ्या अवयवाचा शोध?
शरीरातील पेशींमध्ये इंटरस्टिटियम पसरल्याचा आतापर्यंतचा समज होता. मात्र 'नेचर'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात हा एकसंघ अवयव असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : मानवी शरीरात एका नव्या अवयवाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. इंटरस्टिटियम हा शरीरातील सर्वात मोठा अवयव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरीरातील पेशींमध्ये इंटरस्टिटियम पसरल्याचा आतापर्यंतचा समज होता. मात्र 'नेचर'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात हा एकसंघ अवयव असल्याचं म्हटलं आहे.
इंटरस्टिटियम हा मानवी शरीरातील 80 वा अवयव ठरणार आहे. त्वचा आणि इतर अवयवांखाली असलेल्या पेशी हा दाट थर असल्याचं आतापर्यंत मानलं जात होतं.
नवीन संशोधनानुसार, हा अवयव म्हणजे द्रवपदार्थाने भरलेल्या कप्प्यांचं जाळं आहे. हे जाळं आकुंचित पावू शकतं किंवा प्रसारित होतं. त्यामुळे शॉक अॅब्झॉर्बरप्रमाणे काम करतं.
इंटरस्टिटियममुळे शरीराच्या एका भागातील कर्करोग दुसऱ्या भागात पसरु शकतो. नव्या संशोधनातून शरीरातील या दुर्लक्षित अवयवाविषयी माहिती समोर आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास सुरु आहे. शरीरात 79 अवयव असतात, ही ठाम समजूत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कित्येक वर्षापासून हा अवयव अज्ञात राहिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement