International Men's Day 2021 : 'मेन विल बी मेन'; पण पुरुषांच्या मनामध्येही एक हळवा कोपरा असतो...
International Men's Day 2021 : दरवर्षी 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात येतो. भारतात हा दिवस पहिल्यांदा 2007 साली साजरा करण्यात आला.
International Men's Day 2021 : 'दर्द तो हमें भी होता है, दुखी हो तो मर्द भी रोता है! हॉं हमारे लिये ये कहना जरा मुश्किल होता है! बचपन से सिखां है हमने, मर्द बन, लडका होके क्यों रोता है!' काही संकट आलं किंवा भावनिक प्रसंग निर्माण झाले तर पुरुषाची अवस्था अशीच काहीशी होते. तो आपलं दु:ख सांगू शकत नाही, व्यक्तही होऊ शकत नाही. पुरुषांच्या या सकारात्मक भावनेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन जगभरातील सुमारे 80 देशांत साजरा केला जातो. भारतातही हा दिवस साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास
जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. त्याच धरतीवर 1923 साली काही पुरुषांनी दरवर्षी 23 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची मागणी केली होती. पण त्यावेळी यावर काही निर्णय झाला नाही. सन 1991 साली हा दिवस साजरा करण्याची पुन्हा एकदा संकल्पना मांडण्यात आली. शेवटी 1999 पासून त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या नागरिकांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला आणि जगभरात याचे पालन सुरु झालं. डॉ. जीरोम तिलकसिंह यांचे या क्षेत्रातले योगदान लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांच्या जन्मदिवसानिमित्त 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारतात सर्वप्रथम 2007 साली आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचं महत्व
पुरुषांच्या आरोग्याप्रति, लिंग संबंधाविषयी जागरुकता, लैंगिक समानतेचा विकास करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. एका प्रमुख वेबसाईटने माहिती दिल्याप्रमाणे, महिलांच्या तुलनेत दरवर्षी तीनपटीने जास्त पुरुष आत्महत्या करतात. तीन पैकी एक पुरुष घरघुती हिंसाचाराला बळी पडतात. महिलांच्या तुलनेत पाच वर्षे आधीच पुरुषांचा मृत्यू होतो. त्यामुळे या सर्व गोष्टींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. कुटुंब, समाज, समुदाय, समाज व्यवस्था या सर्वामध्ये पुरुषांच्या योगदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आजच्या दिवशी प्रयत्न केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या :