International Day Of Forest 2022 : आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास, थीम आणि महत्त्व
International Day Of Forest 2022 : जगभरातील लोक दरवर्षी 21 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करतात. जंगले आणि त्यांचे महत्त्व याबद्दल जागरुकता निर्माण करणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
International Day Of Forest 2022 : जगभरात दरवर्षी 21 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिवस (International Day Of Forest 2022) मानला जातो. विविध प्रकारच्या जंगलांच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2012 मध्ये यूएन जनरल असेंब्लीने 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून घोषित केला. हा दिवस लोकांना जंगलांचे महत्त्व आणि जतन करण्याची तसेच जिवंत प्राण्यांच्या जीवनात जंगलांचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय वन दिनाचा इतिहास (International Day Of Forest 2022 History) :
1971 मध्ये, अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) परिषदेच्या 16 व्या सत्राने "जागतिक वनीकरण दिन" ला त्यांचे मत दिले. त्यानंतर सेंटर फॉर इंटरनॅशनल फॉरेस्ट्री रिसर्च (CIFOR) ने 2007 ते 2012 पर्यंत वन दिवस आयोजित केले. नंतर 28 नोव्हेंबर 2012 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिवस (IDF) म्हणून घोषित केला.
आंतरराष्ट्रीय वन दिनाचे महत्त्व (International Day Of Forest 2022 Importance) :
हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी, जंगलांच्या शाश्वत व्यवस्थापनासह त्यांच्या संसाधनांचा विवेकपूर्ण वापर करणे आवश्यक आहे. हे वर्तमान आणि भावी पिढ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी उपयुक्त तसेच गरजेचे आहे. या दिवशी, अनेक एजन्सी देशांना "वृक्ष लागवड मोहिमेसारख्या जंगल आणि झाडांचा समावेश असलेले उपक्रम आयोजित करण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करतात."
आंतरराष्ट्रीय वन दिनाची थीम (International Day Of Forest 2022 Theme) :
2022 ची थीम "वने आणि शाश्वत उत्पादन आणि उपभोग" (Forests and sustainable production and consumption) आहे.
महत्वाच्या बातम्या :
- World Sparrow Day : चिमण्या कुठं गेल्या? आज चिमणी दिन... चिमण्यांना वाचविण्यासाठी 'हे' करूयात
- World Sparrow Day 2022 : 'या चिमण्यांनो परत फिरा...', जागतिक चिमणी दिवस स्पेशल रिपोर्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha