एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय विद्यार्थ्याकडून जगातील सर्वात हलक्या उपग्रहाची निर्मिती
मुंबई : 21 जून 2017 रोजी खगोलविश्वात एका विक्रमाची नोंद होणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे भारत या विक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग असेल. 'नासा' जगातला सर्वात लहान आणि वजनाने हलका उपग्रह अवकाशात सोडणार असून त्याची निर्मिती एका भारतीय विद्यार्थ्याने केली आहे.
'कलामसॅट' असं या उपग्रहाचं नामकरण करण्यात आलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे हा उपग्रह लाँच होईल. बारावीत शिकणाऱ्या 18 वर्षांच्या विद्यार्थ्याने या उपग्रहाची निर्मिती केली आहे.
तामिळनाडूतील पल्लापट्टीमध्ये राहणाऱ्या रिफात शारुकने प्रयोग केला आहे. या उपग्रहाचं वजन अवघं 64 ग्रॅम आहे. हा जगातला सर्वात लहान आणि वजनाने हलका उपग्रह ठरणार आहे. 'द टीकेक' या वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
विशेष म्हणजे एखाद्या भारतीय विद्यार्थ्याने केलेल्या प्रयोगाची दखल 'नासा' प्रथमच घेत आहे. त्यामुळे रिफातचं नाव वैश्विक पातळीवर कौतुकास पात्र ठरणार आहे.
3D प्रिंटिंगद्वारे या प्रकल्पाचं मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे. 'क्युब्ज इन स्पेस' या स्पर्धेतून शारुकच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली. ही स्पर्धा 'नासा' आणि 'आय डूडल लर्निंग' यांनी एकत्रितपणे आयोजित केली होती. या स्पर्धे अंतर्गत चार मीटरच्या चौरसात मावणारा आणि 64 ग्रॅम वजन असलेला प्रकल्प करण्याचं आव्हान जगभरातील विद्यार्थ्यांसमोर होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement