India Pakistan War : 'भारताकडे 16 लाखांची फौज, आपण टिकू शकणार नाही', पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनीच केला लष्कराचा पर्दाफाश
India Pakistan War : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या निवृत्त जनरलमध्ये अस्वस्थता वाढली आहे. जैशचा प्रमुख मसूद अझहरने हल्ल्यात त्याचे लोक मारले गेल्याची पुष्टी केली आहे.

India Pakistan War : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 मे 2025 रोजी भारताने केलेल्या अचूक लष्करी हल्ल्यांनंतर, पाकिस्तानच्या लष्करात आणि सरकारमध्ये अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे.पाकिस्तान सरकार सीमेवर गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांचे निवृत्त लष्करी अधिकारी स्वतः कबूल करत आहेत की भारतासमोर त्यांची लष्करी ताकद कमकुवत होत आहे. पाकिस्तानच्या डॉन टीव्हीवर प्रसारित झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये, माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी पाकिस्तानच्या लष्कराच्या परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "भारताकडे 16 लाख सैन्य आहे, आपल्याकडे फक्त 6 लाख इतकं सैन्य आहे.
कोणताही 'गजवा' आपल्याला वाचवू शकत नाही." त्यांनी असेही कबूल केले की भारताने चार मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याची योजना आखली होती. परंतु पाकिस्तानकडे कोणतीही तयारी किंवा प्रतिसाद नव्हता. मसूद अख्तर म्हणाले की, पाकिस्तानच्या नेतृत्वाला भविष्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दबावासाठी (विशेषतः अमेरिकेकडून) गंभीर विचार करण्याची आवश्यकता आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त
भारताने 7 मे रोजी सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित किमान 100 दहशतवादी ठार झाल्याची पुष्टी झाली आहे. पाकिस्तान सरकारने भारताच्या या कृतीला 'नागरिकांवर हल्ला' असे म्हणत प्रचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरच्या विधानाने हे खोटे उघड केले. भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि चार वरिष्ठ सहकारी मारले गेल्याची कबुली मसूद अझहरने स्वतः दिली.
पाकड्यांची तिसऱ्या दिवशीही खुमखुमी, ड्रोन अन् हलक्या विमानांद्वारे हल्ले
दरम्यान, पाकिस्तानकडून तिसऱ्या दिवशीही ड्रोन आणि हलक्या विमानांद्वारे हल्ले सुरूच असल्याचे बघायला मिळाले आहे. पाकिस्तानकडून ड्रोन आणि हलक्या विमानांद्वारे हे हल्ले केले जात आहे. भारताच्या लष्करानं निवेदन प्रसिद्ध करुन ही माहिती दिली आहे. अमृतसरच्या खासा कँटोनमेंटवर अनेक ड्रोनद्वारे अपयशी हल्ले करण्यात आले. पहाटे पाच वाजता पाकने अमृतसरवर ड्रोन हल्ले केलेत. परिणामी भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी पाकचे हे ड्रोन हवेतच उडवलेत. भारताची सार्वभौमता आणि नागरिकांवरचे हल्ले खपवून घेणार नाही, अशी कठोर भूमिका भारतीय लष्करानं घेतली आहे.
हे ही वाचा
























