जेव्हा भारतीय सैन्याने लाहोरला चारी बाजूंनी घेरलं होतं अन् संपूर्ण पाकिस्तानमध्ये सन्नाटा पसरलेला
India-Pakistan War History : जेव्हा भारतीय सैन्याने लाहोरला चारी बाजूंनी घेरलं होतं अन् संपूर्ण पाकिस्तानमध्ये सन्नाटा पसरलेला

India-Pakistan War History : पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप व्यक्त करण्यात येतोय. जनतेच्या मनात पाकिस्तान विरोधात तीव्र भावना आहेत. दरम्यान, भारत-पाकिस्तान युद्ध भूमीवर अनेकदा आमने-सामने आले आहेत. आपण आज 1965 साली झालेल्या युद्धाचा इतिहास समजून घेऊयात..
भारतीय सैन्याने 6 सप्टेंबर 1965 रोजी पाकिस्तानच्या लाहोर शहरावर चारी बाजूंनी हल्ला करत मोठा दणका दिला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे 8 सप्टेंबर रोजी पठाणकोट- जम्मू पासून सियालकोट पर्यंत जोरदार हल्ले केलेले पाहायला मिळाले. पाकिस्तान सातत्याने जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता, याचं प्रत्युत्तर देताना भारताने लाहोरवर हल्ले केले होते. भारतात्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान चारीमुंड्या चीत झाला होता.
त्या दिवशी काय काय घडलं होतं?
6 सप्टेंबरच्या सकाळी सैनिक चारी बाजूंनी लाहोरच्या बाजूने पुढे सरकू लागले होते. वाघा-डोगराई, खालरा-बुर्की आणि खेमकरण -कसूर या बाजूंनी भारतीय सैन्याने पाकला घेरलं होतं. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली होती.
पूर्व ग्रँड ट्रंक म्हणजेच जीटी रोडवर आणि वाघा सीमेवर असलेल्या सीमेवरील चेक पोस्टवर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने झटपट कब्जा घेण्यास सुरुवात केली होती. भारताने लाहोरच्या बाजूने कुच केली होती. भारतीय सैन्य बाटापूर, डोगराई आणि बरकीच्या बाजूने पोहोचत होते. सध्या हे गाव लाहोरचाच एक भाग बनलंय.
लाहोरवर हल्ला करण्यामागे कोणती कारणं होती?
ऑगस्ट 1965 मध्ये पाकिस्तानात ऑपरेशन जिब्राल्टरला सुरुवात झाली होती. जम्मू काश्मीरमध्ये अघोषित युद्ध सुरु झालं होतं. 1 सप्टेंबर रोजी अखनूर सेक्टरमध्ये टँक आणि वायूसेनाच्या मदतीने सैन्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा उद्देश अखनूरवर कब्जा घेऊन जम्मूच्या बाजूने पुढे सरकण्याचा होता.
दरम्यान, यानंतर भारतीय सैन्याने 5 आणि 6 सप्टेंबर रोजी रात्री पंजाबच्या सीमावर्ती भागातील आंतरराष्ट्रीय सीमा पार केली. त्यानंतर लाहोरमध्ये एकच सन्नाटा पसरला होता. पश्चिमी सैन्याचे कमांडर जनरल हरबख्श सिंह यांच्या माहितीनुसार, ही रणनिती पाकिस्तानी सैन्याला मजबूर करण्यासाठी होती. पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या तुकड्या अखनूरमधून हटवून लाहोरमध्ये हलवाव्यात यासाठी भारतीय सैन्य प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांचे हल्ले सौम्य पडणार होते. भारतीय सैन्य लाहोरच्या इछोगिल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. भारताने हा कब्जा घेतला असता तर लाहोरची सुरक्षा व्यवस्था संपुष्टात आली असती.
इतर महत्त्वाच्या बातम्या























