BrahMos supersonic cruise missile : भारताचा चीनला धक्का ; फिलिपाईन्स भारताकडून खरेदी करणार ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र
फिलिपाईन्स हा अमेरिकेचा मित्रदेश असून चीनविरूद्ध तो आपली लष्करी ताकद वाढवत आहे. याला बळ म्हणून भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची खरेदी फिलिपाईन्स करणार आहे.
BrahMos supersonic cruise missile : फिलिपाईन्स भारताकडून ‘ब्रह्मोस’क्षेपणास्त्राची (BrahMos) खरेदी करणार आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी दोन्ही देशांमध्ये 375 मिलियन डॉलर्स म्हणजे 2770 कोटींचा करार झाला आहे. फिलिपाईन्सचे राष्ट्रीय संरक्षण सचिव डेल्फिन लोरेन्झाना यांनी ‘ब्रह्मोसच्या खरेदीसाठी ‘नोटिस ऑफ अवॉर्ड’काढली असून लवकरच या करारावर स्वाक्षरी होईल.
फिलिपाईन्स हा अमेरिकेचा मित्रदेश असून चीनविरूद्ध तो आपली लष्करी ताकद वाढवत आहे. याला बळ म्हणून भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची खरेदी करणार आहे. फिलिपाईन्सला चीन सतत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आव्हान देत असतो. दक्षिण चीन समुद्रातफिलिपाईन्सच्या अधिकारक्षेत्रावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहेत. अशातच भारत आणि फिलिपाईन्समध्ये झालेला हा करार चीनसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
290 किलोमीटरची रेंज
ब्रह्मोस हे जगातील सर्वात जलद सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. 2.5 टन वजनाचं ब्रह्मोस क्षेपणास्त्र 290 किमी परिसरात ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने मारा करतं. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार ब्रह्मोस मिसाइल निर्यातीची ही पहिली डील आहे. भारत-फिलिपाईन्समध्ये झालेल्या या कारारामुळे फिलिपाईन्ससह इतर आशियाई देश इंडोनेशिया, व्हिएतनाम बरोबरही करार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
फिलिपाईन्सला भारत देणार प्रशिक्षण
दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार भारत फिलिपाईन्सला प्रशिक्षण देणार आहे. ब्रह्मोस’चे सागरी व्हर्जन फिलिपाईन्सला निर्यात करण्यात येणार आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने फिलिपाईन्स नौदलासाठी हा करार करण्यात येत आहे. त्यामुळे फिलिपाईन्स आपल्या सागरी किनारी भागात ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या