एक्स्प्लोर

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षांच्या दालनातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढला, आता फक्त राणेंचा फोटो

Sindhudurg District Bank Politics :   सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीनंतर राणे-ठाकरे वाद पुन्हा समोर आला आहे.

Sindhudurg District Bank Politics :   सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीनंतर राणे-ठाकरे वाद पुन्हा दिसून आला आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनात लावण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असलेला फोटो हटवून त्याठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा फोटो लावण्यात आला आहे. नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे मनीष दळवी (manish dalvi) यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी भाजपचेच अतुल काळसेकर (Atul Kalsekar) विजयी झाले. निवडणुका पार पडल्या असल्या तरी अद्यापही ठाकरे आणि राणे यांच्यातील वाद मात्र थांबायचं नाव घेत नाहीय.

नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी हे नारायण राणे (Narayan Rane) यांचे निकटवर्तीय मानले जातात. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचं अभिनंदन केलं आहे.

शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादात मोठ्या प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत राणेंनी जिल्हा बँकेत पुन्हा सत्ता मिळवली. निवडणुकीत 11 विरूद्ध 8 अशा फरकाने भाजपने सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला. 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कणकवलीत झालेल्या संतोष परब हल्ला प्रकरण राज्यभर गाजलं. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. मात्र भाजपनं जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवलं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून होते. जिल्हा बँकेत 12 विद्यमान संचालकांना पराभव पत्करावा लागला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; महाविकास आघाडीचा पराभव, राणे पॅटर्नचा डंका, कार्यकर्त्यांचा जल्लोष

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाची पाच महत्वाची वैशिष्ट्यं; सविस्तर निकाल पाहा एका क्लिकवर

Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: कडक कपडे घालून शानमध्ये येणार; वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार, जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
कडक कपडे घालून शानमध्ये येणार; वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार, जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
Walmik Karad: वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, राज्यातील ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून बंद, 'या' 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, राज्यातील ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून बंद, 'या' 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhandara Pollution : भंडाऱ्यात उडणाऱ्या धुळीनं हवेची गुणवत्ता बिघडली, नागरिकांना विविध आजारTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 31 डिसेंबर 2024: ABP MajhaTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 31 डिसेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 09 AM : 31 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: कडक कपडे घालून शानमध्ये येणार; वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार, जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
कडक कपडे घालून शानमध्ये येणार; वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार, जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
Walmik Karad: वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, राज्यातील ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून बंद, 'या' 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, राज्यातील ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून बंद, 'या' 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु
Satish Wagh Case: सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
मोठी बातमी : वाल्मिक कराड पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!
मोठी बातमी : वाल्मिक कराड पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
Embed widget