एक्स्प्लोर
सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान भेदरलं, ISI प्रमुखाला पदावरुन हटवलं
![सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान भेदरलं, ISI प्रमुखाला पदावरुन हटवलं In A Big Reshuffle Pakistan Army Chief Proposed The New Isi Chief सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान भेदरलं, ISI प्रमुखाला पदावरुन हटवलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/12111624/pak-isi-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
इस्लामाबाद: भारताने सप्टेंबरमध्ये केलेल्या यशस्वी सर्जिकल स्टाईकनंतर हडबडलेल्या पाकिस्तानने आपल्या सुरक्षायंत्रणेत मोठे फेरबदल केले आहेत. पाकिस्तानचे नवनियुक्त सैन्यदलप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी रविवारी पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा ISIच्या प्रमुखपदी असलेल्या रिजवान अख्तर यांची तडकाफडकी उचलबांगडी करुन, त्या जागी लेफ्टिनंट जनरल नवीद मुख्तार यांची नियुक्ती केली आहे.
भारतीय सैन्यदलाने सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने पाकिस्तानची जगात नाचक्की झाली. भारताच्या या यशस्वी सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानच्या तोंडचे पाणीच पळाले होते. यावरुन पाकिस्तानच्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख रिजवान अख्तर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थीत होत होते. पण आता नवनियुक्त सैन्यदल प्रमुखांनी त्यांना पदावरुन हटवलं आहे.
वास्तविक, आयएसआय प्रमुखाची नियुक्ती ही तीन वर्षांची असते. जनरल अख्तर यांची नोव्हेंबर 2014 मध्ये आयएसआयच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण भारताच्या यशस्वी सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत होती.
दरम्यान, याबाबत पाकिस्तानच्या सैन्यदलाच्या वतीने या प्रकरणावर एक निवेदन जाहीर करण्यात आले असून, रिजवान अख्तर यांचे पुनर्वसन नॅशनल डिफेंस युनव्हर्सिटीच्या अध्यक्षपदी करण्यात आले आहे. तर लेफ्टिनंट जनरल बिलाल अकबर यांची चीफ ऑफ जनरल स्टाफ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय इतरही अनेक महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)