एक्स्प्लोर

S Jaishankar Pakistan Visit : मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!

S Jaishankar Pakistan Visit : परराष्ट्र मंत्री जयशंकर 15-16 ऑक्टोबरला पाकिस्तानला भेट देणार आहेत. येथे ते SCO च्या सरकार प्रमुखांच्या (CHG) बैठकीला उपस्थित राहतील.

S Jaishankar Pakistan Visit : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने म्हटले आहे की ते त्यांच्या निषेधासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना आमंत्रित करणार आहेत. पाकिस्तानी मीडिया 'द न्यूज इंटरनॅशनल'नुसार, पीटीआयचे माहिती सल्लागार बॅरिस्टर अली सैफ यांनी ही माहिती दिली. जिओ न्यूज चॅनलच्या शोमध्ये सैफ म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असल्याचा दावा करतो. पाकिस्तान सरकार त्यांना दाखवत आहे की इथे निषेधाला जागा नाही. त्यांनी इस्लामाबादच्या बाहेर 10 हजार कंटेनर उभे केले आहेत.

जयशंकर यांनी आमच्या रॅलीला संबोधित करावे

पीटीआय नेत्याने सांगितले की, "जयशंकर यांनी आमच्या रॅलीला संबोधित करावे अशी आमची इच्छा आहे, जेणेकरुन भारताला कळेल की पाकिस्तान देखील एक मजबूत लोकशाही देश आहे. येथील लोक निश्चितच गरज असेल तेव्हा निषेध करण्याचा त्यांचा अधिकार वापरतात." पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या आवाहनावर एहरीक-ए-इन्साफ पक्षाचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. हे कार्यकर्ते इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी करत आहेत. शनिवारी शेकडो कार्यकर्ते आंदोलनासाठी डी चौकाकडे जात होते, त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी पीटीआय कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. राजधानी इस्लामाबादमध्ये पोलिसांनी मोबाईल सेवा आणि इंटरनेटवर बंदी घातली आहे. इस्लामाबाद आणि लाहोरसह अनेक शहरांमध्ये सुरक्षा सुधारण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. SCO बैठक होईपर्यंत लष्कराचे जवान शहराच्या सुरक्षेत राहतील.

जयशंकर एससीओ बैठकीसाठी पाकिस्तानला जाणार 

परराष्ट्र मंत्री जयशंकर 15-16 ऑक्टोबरला पाकिस्तानला भेट देणार आहेत. येथे ते SCO च्या सरकार प्रमुखांच्या (CHG) बैठकीला उपस्थित राहतील. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. 2015 मध्ये सुषमा स्वराज नंतर भारतीय मंत्र्याची ही पहिलीच पाकिस्तान भेट असेल. 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, इम्रान खान यांच्या पक्षाने 7 सप्टेंबर रोजी पहिली रॅली काढली. न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे इम्रानच्या पक्षाला निवडणूक लढवता आली नाही, त्यांच्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.  रॅलीदरम्यान, नॅशनल असेंब्लीमधील पीटीआय नेते उमर अयुब खान म्हणाले होते की, इम्रान खानची सुटका होईपर्यंत पक्ष गप्प बसणार नाही. आम्ही इम्रान खानचे सैनिक आहोत आणि जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत बसणार नाही, असे ते म्हणाले होते.

इम्रान गेल्या वर्षी ऑगस्टपासून तुरुंगात

तोशाखान्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर इम्रान खान यांना गेल्यावर्षी 5 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो अनेक गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहे. रविवारी इम्रानने तुरुंगात 400 दिवस पूर्ण केले. 13 जुलै रोजी इस्लामाबाद कोर्टाने इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांची बनावट निकाह प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. त्यांना तातडीने सोडण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर अवघ्या 5 तासांनंतर नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) च्या टीमने त्याला तोशाखान्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात अटक केली.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaSharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागतABP Majha Headlines : 05 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सOne Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन कशी होणार? काय आवश्यक?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Yuvraj Singh Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Embed widget