एक्स्प्लोर

पाक पंतप्रधानांच्या नावाशेजारी 'बेगिंग', PTV च्या संचालकांची उचलबांगडी

इम्रान खान यांचा सहभाग असलेल्या एका कार्यक्रमाचं प्रक्षेपण करताना 'पीटीव्ही'ने चीनची राजधानी बीजिंगचं स्पेलिंग चुकवलं आणि 'बेगिंग' असं केलं.

मुंबई : अनेकदा वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमध्ये व्याकरणाच्या चुका होतात. अशाच एका चुकीमुळे पाकिस्तानातील सरकारी वृत्तवाहिनी 'पीटीव्ही'च्या व्यवस्थापकीय संचालकांना नोकरी गमवावी लागली. पाक पंतप्रधान इम्रान खान यांची दृश्यं दाखवताना 'बीजिंग'ऐवजी 'बेगिंग' लिहिण्याची चूक त्यांना महागात पडली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या चीन दौऱ्यावर असून राजधानी बीजिंगमध्ये आहेत. इम्रान खान यांचा सहभाग असलेल्या एका कार्यक्रमाचं प्रक्षेपण करताना 'पीटीव्ही'ने चीनची राजधानी बीजिंगचं स्पेलिंग चुकवलं आणि 'बेगिंग' असं केलं. बेगिंगचा अर्थ भीक मागणे होत असल्याने खरोखर अर्थाचा अनर्थ झाला. पीटीव्हीच्या स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात लोकेशनमध्ये बेगिंग असा शब्द दिसत असतानाच इम्रान खान भाषण देत होते. महत्त्वाचा शब्द लिहिताना कर्मचाऱ्यांनी केलेली हलगर्जी व्यवस्थापकीय संचालकांना भोवली. 'पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ' (पीटीआय) सरकारने चॅनलचे एमडी अर्शद खान यांची तात्काळ उचलबांगडी केली. या भाषणाचा बेगिंग असा उल्लेख असणारा स्क्रीनशॉर्ट आणि काही सेकंदांचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन

मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय

शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानियाAkola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजारJob Majha | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी | 01 April 2025 | ABP MajhaManoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या

शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार

Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
Embed widget