एक्स्प्लोर
इम्रान खान तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत, आध्यात्मिक गुरुशी सूत जुळलं!
बुशरा मेनका या आध्यात्मिक परंपरेतील आहेत. इम्रान खान हे बुशरा यांच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत. दोघेही एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत होते.
कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. आध्यात्मिक गुरु बुशरा मेनका हिच्यासोबत इम्रान खान यांनी लग्नाची गाठ बांधली.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर पीटीआय पक्षाने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन इम्रान खान यांना लग्नाच्या शुभेच्छा देऊन, लग्नाच्या बातमीवरही शिक्कामोर्तब केले.
इम्रान खान आणि पत्नी बुशरा मेनका यांच्या लग्नाचे फोटोही पीटीआयने ट्विटर हँडलवरुन शेअर केले.
बुशरा मेनका या आध्यात्मिक परंपरेतील आहेत. इम्रान खान हे बुशरा यांच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत. दोघेही एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत होते. इम्रान खान यांचं पहिलं लग्न जेमिमा गोल्डस्मिथ हिच्याशी 1995 साली झाले होते. जेमिमासोबत 9 वर्षांच्या नात्यानंतर 2004 मध्ये इम्रान खान यांनी जेमिमाला तलाक दिला. 2015 मध्ये टीव्ही प्रेझेंटर रेहम खान हिच्याशी इम्रान खान विवाहबद्ध झाले. मात्र हे नातं केवळ 10 महिने टिकलं. आता इम्रान खान यांनी बुशरा मेनका हिच्याशी लग्न करुन, तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.#ImranKhan gets married for a third time. #Pakistan pic.twitter.com/PcHg7KXixh
— ANI (@ANI) February 18, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement