एक्स्प्लोर
Advertisement
कुलभूषण जाधव प्रकरणी काही तासातच फैसला
नवी दिल्ली: भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल आज (गुरुवार) आंतरराष्ट्रीय न्यायालयात लागणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा युक्तीवाद पूर्ण झाला असून भारतीय प्रमाण वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता निकाल सुनावला जाणार आहे.
या निकालाचं आंतरराष्ट्रीय कोर्टातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष कोर्टाच्या निकालाकडे लागलं आहे.
आंतरराष्ट्रीय कोर्टाचा पाकला दणका
सोमवारी झालेल्या सुनावणीत ज्या व्हिडीओच्या आधारावर पाकिस्तान आपली बाजू मांडणार होतं, तो कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ कोर्टात दाखवण्यास परवानगी नाकारत आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानाला मोठा दणका दिला होता.
‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. आंतरराष्ट्रीय कोर्टाने यापूर्वीच कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.
पाकचा सर्वात मोठा पुरावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळला!
भारताच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी भारताची बाजू भक्कमपणे कोर्टासमोर मांडली. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे, असा दावा भारताच्या वतीने कोर्टासमोर करण्यात आला.
15 मे रोजी दुपारी दीड वाजता सुनावणीला सुरुवात झाली. या सुनावणीचं थेट प्रक्षेपण संयुक्त राष्ट्रसंघाच्या आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वेबसाईटवर करण्यात आलं.
हेरगिरी करत असल्याचा आरोप करत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. भारताने 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील प्रक्रिया काय?
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया महत्वाची आहे. कुलभूषण जाधव यांना भेटण्याचीही परवानगी पाकिस्तानने दिली नव्हती. जगभरात या कायदेशीर बाबी पाळल्या जातात.
जाणकारांच्या मते पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश पाळावे लागतील. कारण जगभरातील जवळपास 195 देश या न्यायालयाशी संलग्नित आहेत. पाकिस्तानला यामधून बाहेर पडणं परवडणारं नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव पाकिस्तानवर राहिलं.
कुलभूषण यांच्या आईला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय कळवला : सुषमा स्वराज
परराष्ट्र मंत्रालयाकडून कुलभूषण यांच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न चालू होते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज स्वतः कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होत्या. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाची माहिती कुलभूषण जाधव यांच्या आईला दिली असल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.
कुलभूषण जाधव प्रकरणी ज्येष्ठ वकील हरिश साळवे भारताची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडत आहेत, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी दिली.
भारताची पहिली चाल यशस्वी: अॅड. उज्ज्वल निकम
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.
कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडीओत 102 कट्स
संबंधित बातम्या :
कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
बातम्या
Advertisement