एक्स्प्लोर

Meloni vs Trump : ट्रम्प म्हणाले, मेलोनींनी माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी भीक मागितली; जॉर्जिया मेलोनी भडकल्या, खोट्यालाही काही मर्यादा असतात...

Meloni vs Trump Controversy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी-7 शिखर परिषदेतील फोटोवरून केलेल्या दाव्यावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून अमेरिका आणि इटलीमधील संबंध ताणले आहेत. जॉर्जिया मेलोनी(Giorgia Meloni)  यांनी आपल्यासोबत एक फोटो काढण्यासाठी गयावया केली, मला त्यांची कीव आली, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं. त्यावर आता मेलोनी यांनी प्रत्युत्तर दिलं. खोट्यालाही काही मर्यादा असतात, इटली कुणासमोर भीक मागत नाही, अशा शब्दात मेलोनी यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर इटलीने त्यांचा अमेरिकाचा दौराही रद्द करत नाराजी व्यक्त केली आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्याच मित्र देशांसोबत अशा प्रकारचे वर्तन करतात, हे पाहून आपल्याला अत्यंत आश्चर्य आणि दुःख झाल्याचं मेलोनी यांनी म्हटलं आहे. त्यांची वक्तव्य म्हणजे निव्वळ थापा असतात, असंही मेलोनी म्हणाल्या. 

Giorgia Meloni Statement On Trump : खोट्यालाही काही मर्यादा असते

पंतप्रधान मेलोनी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "ट्रम्प यांचं वक्तव्य तथ्यांपासून कोसो दूर आहे. असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु हे अत्यंत लज्जास्पद आहे. काही गोष्टींना तात्काळ उत्तर देणं अत्यंत गरजेचं असतं. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान पूर्णपणे खोटं आहे. जेवढी सक्ती आणि कठोरपणा ट्रम्प आपल्या मित्र देशांच्या विरोधात दाखवतात, तेवढीच ठाम भूमिका ते पाश्चात्य देशांचे विरोधक आणि अमेरिकेच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांसमोर का दाखवत नाहीत? ट्रम्प हे अशा जागतिक नेत्यांबद्दल मवाळ भूमिका घेतात, ज्यांची धोरणे पाश्चात्य देशांच्या हिताच्या पूर्णपणे विरोधात आहेत."

आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी ट्रम्प यांना सर्वात कडक इशारा दिला. त्या म्हणाल्या, "एक गोष्ट त्यांनी नीट लक्षात ठेवावी, मी आणि इटली देश कधीही कोणाकडे भीक मागत नाही."

Donald Trump On Giorgia Meloni : ट्रम्प यांनी नेमका काय दावा केला होता?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जी-7 शिखर परिषदेतील (G7 Summit) एका फोटोचा संदर्भ देत मेलोनी यांच्यावर टिप्पणी केली होती. ट्रम्प म्हणाले होते की, "जॉर्जिया मेलोनी यांनी जी-7 शिखर परिषदेत माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी अक्षरशः गयावया केली होती. मला त्यांची दया आली, म्हणून मी त्यांच्यासोबत फोटो काढू दिला. मी तसे करण्यास नकारही देऊ शकलो असतो, पण मला त्यांची कीव आली. माझ्याशी बोलून कदाचित त्यांना खूप आनंद झाला असेल, वास्तविक मला त्यांच्याशी बोलण्याची कोणतीही गरज नव्हती." 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या याच विधानानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 

Italy Cancels US Trip : इटलीच्या उपपंतप्रधानांचा अमेरिका दौरा रद्द

ट्रम्प यांच्या या विधानाचे पडसाद आता दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांवर उमटू लागले आहेत. इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनियो तजानी यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. तजानी यांनी स्पष्ट केलं की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विरोधात केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर आणि अपमानास्पद आहे. हा केवळ मेलोनी यांचा नाही, तर संपूर्ण इटली देशाचा अपमान आहे. याच कारणामुळे मी 21 आणि 21 जून रोजी असणारा माझा अधिकृत अमेरिका दौरा तात्काळ रद्द करत आहे."

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget