G20 Summit : तब्बल तीन वर्षांनंतर PM मोदी आणि शी जिनपिंग समोरासमोर, हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले...
PM Modi Meets Xi Jinping : कोरोना आणि त्यानंतर पूर्व लडाखमधील सीमेवरील तणावामुळे दोन्ही नेत्यांमधील थेट संवादाचा मार्ग बंद झाला होता.
PM Modi Meets Xi Jinping : तब्बल तीन वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ( Xi Jinping) यांच्यात समोरासमोर भेट झाली आहे. इंडोनेशियातील बाली येथे G20 शिखर परिषदे दरम्यान (G20 Summit) दोन्ही नेते समोरासमोर आले. त्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या डिनर पार्टीमध्ये त्यांनी एकमेकांशी प्रेमाने हस्तांदोलन केले. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील होते. कोरोना आणि त्यानंतर पूर्व लडाखमधील सीमेवरील तणावामुळे दोन्ही नेत्यांमधील थेट संवादाचा मार्ग बंद झाला होता.
#WATCH | Prime Minister Narendra Modi meets Chinese President Xi Jinping and US Secretary of State Antony Blinken at G20 dinner hosted by Indonesian President Joko Widodo in Bali, Indonesia.
— ANI (@ANI) November 15, 2022
(Source: Reuters) pic.twitter.com/nZorkq4R1Y
आणि मोदींनी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन तर केलेच, पण...
डिनर संपल्यावर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची भेट घेण्यासाठी आले. यादरम्यान विडोडोच्या जवळ बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीही उठले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन तर केलेच, शिवाय काही काळ संभाषणही केले. यावेळी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पत्नी पेंग लिउयानही उपस्थित होत्या. इतकंच नाही तर या डिनर बैठकीत दोन्ही नेत्यांची आधी भेट झाली, नंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विनय क्वात्राही पोहोचले.
तब्बल तीन वर्षांनंतर PM मोदी आणि PM शी जिनपिंग समोरासमोर
यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत मोदी आणि जिनपिंग एका व्यासपीठावर एकत्र आले होते, परंतु त्यांच्यात थेट संवाद झाला नव्हता. PM मोदी SCO नेत्याच्या डिनरला उपस्थित होते. मंगळवारी मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीमुळे त्यांच्यातील द्विपक्षीय बैठकीबाबतही चर्चा होत आहे. मोदी आणि जिनपिंग यांच्या उपस्थितीतील शेवटची द्विपक्षीय बैठक नोव्हेंबर 2019 मध्ये ममल्लापुरम (चेन्नई) येथे झाली होती.
2020 मध्ये दोन्ही देशांमधील संबंध बिघडले
2018 मध्ये दोन्ही नेत्यांनी अनौपचारिक चर्चेसाठी पहिली भेट वुहानमध्ये झाली. दुसऱ्या बैठकीनंतर 2020 मध्ये तिसऱ्या बैठकीची तयारी करण्यात आली होती, परंतु मे 2020 मध्ये पूर्व लडाख भागात चिनी सैन्याच्या घुसखोरीनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. त्यानंतर जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. गेल्या दोन वर्षांत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चार द्विपक्षीय चर्चा झाली, मात्र उच्च पातळीवर एकही बैठक झालेली नाही. सप्टेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात चीन आणि भारत यांच्यात पूर्व लडाखमधील तणावग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्याची घोषणा करण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या