G20 Summit: ते आले, त्यांनी पाहिलं, अन्..., पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाजवलं इंडोनेशियन पारंपरिक वाद्य; व्हिडीओ होतोय व्हायरल
PM Modi Viral Video: G20 बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली.

नवी दिल्ली: G20 बैठकीच्या निमित्ताने इंडोनेशियाला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील पारंपरिक संगीत वाद्याचा आनंद लुटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातील भारतीय समूदायाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी या पारंपरिक वाद्याचे वादन केलं. या संबंधिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय समूदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली. पंतप्रधानांचे आगमन होताच त्या ठिकाणी इंडोनेशियन वाद्य वाजवणाऱ्या दोन व्यक्तींनी त्यांचं स्वागत केलं. हे वाद्य ऐकताना पंतप्रधानांनाही ते वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी हे वाद्य वाजवलं. नंतर त्यांनी या वादकांना अभिवादन केलं आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते सभागृहात गेले.
#WATCH | Prime Minister Narendra Modi arrives at the venue in Bali, Indonesia where an Indian community event will be held shortly; also tries his hands at traditional Indonesian musical instruments.
— ANI (@ANI) November 15, 2022
(Source: DD) pic.twitter.com/xYsGzP1zzS
या बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. G20 गटाची 17 वी शिखर परिषद 15 आणि 16 नोव्हेंबर दरम्यान इंडोनेशियाती बाली या ठिकाणी पार पडत आहे.
'या' देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होतील?
इंडोनेशियात होत असलेल्या या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे ( America ) अध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden ), ब्रिटनचे ( Britain ) पंतप्रधान ऋषी सुनक ( Rishi Sunak ), फ्रान्सचे ( France ) राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ( Emmanuel Macron ), जर्मनीचे ( Germany ) चांसलर ओलाफ स्कोल्झ ( Olaf Scholz ) आणि चीनचे ( China ) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ( Xi Jinping ) हेही जी20 शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत.
पुढच्य वर्षी म्हणजे 2023 मध्ये होणाऱ्या G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे. या परिषदेचे 2023 ला भारतात आयोजन करण्यात येणार आहे. 1 डिसेंबरपासून भारत औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी 17 वी शिखर परिषद पार पडणार आहे. या शिखर परिषदेच्या समारोपाच्या सत्रात इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रतीकात्मकपणे G20 चे अध्यक्षपद पंतप्रधान मोदींना सुपूर्द करतील.























