एक्स्प्लोर

G20 | कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी जी 20 देशांची एकजूट, पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक

कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी सोबत काम करणार असल्याचा संकल्प जी 20 देशांच्या नेत्यांनी केला आहे. ही G20 देशांची बैठक पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली.

नवी दिल्ली: जागतिक महामारी घोषित झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी 20 देशांनी एकजूट दाखवत मिळून काम करण्याचा संकल्प केला आहे. G20 देशांच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी जागतिक आरोग्य संघटने (WHO) सारख्या संस्थांना मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. सोबतच उपचारासाठी लागणारी सामुग्री, टेंस्टिंग किट्स, वॅक्सिंग आणि या संबंधित खरेदी आणि आयातीसंदर्भात देखील भूमिका ठरवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जी20 देशातील नेत्यांनी COVID19 च्या या संकटामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानभरपाईसाठी हिस्सेदारी करण्यावर देखील सहमती दर्शवली.

Coronavirus | प्रभासकडून चार कोटींची मदत; कलाकार, राजकीय नेते, कर्मचारीही सरसावले

सौदी अरबचे पंतप्रधान शाह सलमान बिन अब्दुल अजीज-अल-सौद यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. ही बैठक कोरोनाच्या महामारीमुळे पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासह जी 20 देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे य बैठकीला जागतिक आरोग्य संघटना, जागतील खाद्य संघटना, आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेसह अन्य काही आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं कवच, गरिबांना 1.70 लाख कोटींचं पॅकेज : अर्थमंत्री सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री झालेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तीन मिनिटांच्या भाषणार कोरोना व्हायरससंदर्भात मत व्यक्त करताना या जागतिक महामारीला आटोक्यात आणण्यासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. त्यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय संस्थांनी केवळ आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी नव्हे तर मानवी आरोग्य आणि विकासाला केंद्र मानून कार्यक्रम तयार करावा, असं मत मांडलं. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी चांगल्या आरोग्य सेवांसाठी जागतिक स्तरावर होणाऱ्या संशोधनाला सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था तयार करावी, असा आग्रह देखील केला. कोरोनाच्या या महामारीचा सर्वाधिक फटका जी 20 देशांनाच बसला असल्याचे सांगत मोदींनी यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एकत्रित येऊन अधिक चांगले प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget