Coronavirus | प्रभासकडून चार कोटींची मदत; कलाकार, राजकीय नेते, कर्मचारीही सरसावले
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 700 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर सरसावले आहेत. प्रभासने 4 कोटींची मदत केली असून राष्ट्रवादीचे आमदार-खासदारही आपला एक महिन्याचा पगार सरकारला मदतीसाठी देणार आहेत.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीसोबत लढण्यासाठी संपूर्ण देश एकजूट झाला आहे. सर्व जण आपापल्या परीने, क्षमतेनुसार यात आपलं योगदान देत आहेत. यामध्ये सिनेकलाकार, खेळाडू, राजकीय नेते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कठीणसमयी मदतीचा हात पुढे केला आहे.
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 700 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झाला असून 45 उपचारांनी बरे झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे.
प्रभासकडून 4 कोटींची मदत 'बाहुबली' अर्थात प्रभासने कोरोना महामारीसोबत दोन हात करण्यासाठी चार कोटी रुपयांची मदत केली आहे. प्रभासने गुरुवारी (26 मार्च) 3 कोटी रुपये पंतप्रधान मदतनिधीमध्ये तर 50-50 लाख रुपये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केले.
दरम्यान प्रभास नुकताच जॉर्जियाहून परतला आहे. आगामी 'प्रभास 20' या चित्रपटाचं शूटिंग तिथे सुरु होतं. तिथून परतल्यानंतर खबरदारी म्हणून प्रभासने स्वत:ला होम क्वॉरन्टाईन
तेलुगू अभिनेत्यांकडून मदतीचा हात त्याआधी तेलुगू अभिनेता पवन कल्याण यांनीही दोन कोटी रुपये मदत निधीला दान केली होती. तसंच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही प्रत्येकी 50 लाखांची मदत करणार असल्याचं त्याने सांगितलं.
I will be donating Rs.1 crore to PM relief fund to support our https://t.co/83OmZ9biYX Sri @narendramodi ji,in turbulent times like this. His exemplary and inspiring leadership would truly bring our country from this Corona pandemic.
— Pawan Kalyan (@PawanKalyan) March 26, 2020
याशिवाय पवन कल्याण यांचा पुतण्या रामचरणने 1 कोटी 40 लाख, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीने 1 कोटी आणि महेश बाबूने 1 कोटी रुपये दान केले आहेत.
हृतिक आणि कपिलही सरसावले बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि कॉमेडियन कपिल शर्म हे देखील मदतीसाठी समोर आले आहेत. हृतिक रोशनने मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी एन-95 आणि एफएफपी-3 मास्क खरेदी केले आहेत. तर कपिल शर्मानेही पंतप्रधान मदत निधीमध्ये 50 लाख रुपयांची रक्कम दान केल्याचं म्हटलं आहे.
In times such as these, we must do whatever we can to ensure the safety of the most fundamental caretakers of our city and society. I have procured N95 and FFP3 masks for our BMC workers and other caretakers... 1/2
— Hrithik Roshan (@iHrithik) March 26, 2020
It's time to stand together with the ones who need us. Contributing Rs.50 lakhs to the PM relief fund towards the #fightagainstcorona. Request everyone to #stayhome #staysafe #jaihind #PMrelieffund @narendramodi ???? ????????
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) March 26, 2020
याशिवाय करण जोहर, आयुष्मान खुराना, नितेश तिवारी, तापसी पन्नू, सोनम कपूर, दिया मिर्झा हे कलाकारही रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.
सौरव गांगुली 50 लाख रुपयांचे तांदूळ देणार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अनेक जण विशेषत: हातावर पोट असलेले मजूर अडचणींचा सामना करत आहे. या लोकांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष सौरव गांगुली समोर आला आहे. सौरव गांगुली गोरगरिबांना मोफत तांदूळ वाटणार आहे. यासाठी तो 50 लाख रुपये खर्च करणार आहे.
Let’s fight this together .. we will get over this #corona pic.twitter.com/OTH2iJbPMz
— Sourav Ganguly (@SGanguly99) March 24, 2020
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचं वेतन महाराष्ट्रातील पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या पुणे विभागातील 5300 पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी मार्च 2020 मधील एका दिवसाचं वेतना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमवरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार-खासदार एक महिन्याचा पगार दान करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचललं आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधानपरिषद आमदार तसंच खासदार एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहे.
राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी व संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'प्रधानमंत्री सहाय्यता निधी'ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री. @Jayant_R_Patil यांचेकडे जमा करावेत.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 26, 2020
Coronavirus Outbreak | लॉकडाऊनमुळे मजूर आणि विद्यार्थ्यांवर पायी प्रवास करण्याची वेळ