एक्स्प्लोर
VIDEO: जेव्हा सिंह जबड्यात रिंगमास्तराची मान धरतो
डलन्स, फ्रान्स : सर्कशीत किंवा झूमध्ये पिंजऱ्यात कैद असलेले वाघ-सिंह पाहायला मजा येते. मात्र सर्कशीतला सिंह जेव्हा अनावर होऊन रिंगमास्तराची मानगुटच धरतो, तेव्हा प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही.
सर्कशीत सिंहाचे खेळ सुरु असताना अचानक सिंह भेदरला आणि त्याने रिंगमास्तराचीच मान जबड्यात धरली. यावरच न थांबता त्याने रिंगमास्तराला रिंगणात फरपटत नेलं. सुदैवाने तिशीतल्या या रिंगमास्तराची सुटका करण्यात सहकाऱ्यांना यश आलं.
प्रसंगावधान दाखवत सहकाऱ्यांनी सिंहाच्या पिंजऱ्यात फायर एक्स्टिंग्विशर सोडला. त्यामुळे सावज सोडून सिंह दुसऱ्या दिशेने पळाला. त्यासरशी रिंगमास्तर अडखळत उभा राहिला आणि रिंगणाबाहेर पडला. सिंहाचं वय 6 वर्ष असल्याची माहिती आहे.
रविवारी संध्याकाळी उत्तर फ्रान्समधील डलन्स प्रांतात भरलेल्या बफेलो सर्कशीत हा चित्तथरारक प्रकार घडला. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये प्रेक्षकांच्या किंकाळ्याही स्पष्टपणे ऐकू येत आहेत.
स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार रिंगमास्तराला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात असून त्याच्या मानेभोवती गंभीर जखमा झाल्या आहेत.
व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement