Republic Day 2022 : ITBP जवानांनी लडाखमध्ये उणे 35 अंश तापमानात साजरा केला प्रजासत्ताक दिन, 15 हजार फूट उंचीवर फडकवला तिरंगा
Republic Day 2022 : आज देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी उत्तराखंडमध्ये शून्य तापमानात प्रजासत्ताक दिन साजरा केला.
Republic Day 2022 : आज देशभरात 73 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. यानिमित्ताने देशाच्या विविध भागातून भारतीय लष्करातील जवानांचे धाडस दाखवणारे आणि प्रजासत्ताक दिन साजरा करणारे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. दरम्यान, लडाखमधील इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन 15 हजार फूट उंचीवर साजरा केला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
15 हजार फूट उंचीवर प्रजासत्ताक दिन साजरा
आयटीबीपीच्या जवानांनी अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांनी भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन लडाखमध्ये उणे 35 अंश सेल्सिअस तापमानात 15 हजार फूट उंचीवर साजरा केला. दुसरीकडे, उत्तराखंडच्या कुमाऊं भागात, ITBP जवानांनी 12 हजार फूट उंचीवर प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि तिरंगा फडकवला.
आईटीबीपी के हिमवीरों का राष्ट्र को नमन
— ITBP (@ITBP_official) January 26, 2022
Happy Republic Day from #Himveers of ITBP
From #Ladakh#RepublicDay2022 #RepublicDay #गणतंत्रदिवस pic.twitter.com/bS1A8pnPlH
जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था
प्रजासत्ताक दिनानिमित्त जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यादरम्यान पोलीस कर्मचारी जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये रस्त्यांवर वाहनांची तपासणी करताना दिसले. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत विविध ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान तैनात असतात. यादरम्यान सुरक्षा कर्मचारी रस्त्यावरील वाहनांची तपासणी करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Republic Day : भारताच्या लष्करी सामर्थ्यापासून ते सांस्कृतिक विविधतेपर्यंत, जाणून घ्या परेडशी संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी
- Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनी राजपथावर दिसणार देशाचे सामर्थ्य, राजपथावरील परेडची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर
- प्रजासत्ताक दिनाआधी भारताला श्रीलंकेकडून मोठी भेट, 56 भारतीय मच्छीमारांची सुटका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha