एक्स्प्लोर
फ्लोरिडात पुन्हा नाईट क्लबमध्ये गोळीबार, दोघांचा मृत्यू

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये पुन्हा एकदा नाईट क्लबला लक्ष्य करण्यात आलं आहे. नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी असल्याची माहिती आहे. फ्लोरिडाच्या फोर्ट मेयर्समध्ये असलेलं नाईट क्लब ब्ल्यूमध्ये हल्लेखोर घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. रात्री एकच्या सुमारास झालेल्या या घटनेत दोघांना जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी नाईट क्लबला घेराव घातला. गेल्याच महिन्यात फ्लोरिडातील एका गे नाईट क्लबमध्ये हल्ला झाला होता. यामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























