एक्स्प्लोर
अमेरिकेचे माजी अध्यक्ष सीनियर जॉर्ज बुश यांचं निधन
12 जून 1924 रोजी जन्मलेल्या जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश यांनी 1989 पासून 1993 पर्यंत अमेरिकेचे 41वे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष सीनियर जॉर्ज बुश यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आणि माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ही माहिती दिली. याच वर्षी 17 एप्रिल रोजी त्यांची पत्नी बार्बरा बुश यांचं (वय 92 वर्ष) निधन झालं होतं.
12 जून 1924 रोजी जन्मलेल्या जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश यांनी 1989 पासून 1993 पर्यंत अमेरिकेचे 41वे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. राष्ट्राध्यक्ष बनण्याआधी बुश 1981 पासून 1989 पर्यंत उपराष्ट्राध्य होते. त्यांची राजकीय कारकीर्द तीन दशकांची होती.
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैन्यात राहून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. सीनियर बुश यांनी अमेरिकेला शीतयुद्धामधून बाहेर काढण्यास मदत केली होती. ते टेक्सासचे खासदार होते. याशिवाय ते केंद्रीय तपास यंत्रणा (सीआयए)चे संचालकही होते.
जॉर्ज एच डब्लू बुश यांच्या कार्यकाळातच अमेरिकेने 1991 मध्ये खाडी युद्ध जिंकलं होतं. मात्र पुढच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा बिल क्लिंटन यांच्याकडून पराभव झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement