Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट? इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याच्या बातमीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून इस्लामाबादमधील इम्रान खान यांच्या घराजवळ सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Islamabad Police : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे शहरातील बनी गालाजवळील भागात सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आल्याचे इस्लामाबाद पोलिसांनी म्हटले आहे. इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. इस्लामाबाद पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्लामाबादमध्ये लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी (Ban On People Gathering) लागू करण्यात आली आहे.
या संदर्भात इस्लामाबाद पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घराच्या परिसरात असलेल्या गालामध्ये त्यांच्या आगमनाच्या माहितीनुसार सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, इम्रान खान यांच्या टीमच्या पुनरागमनाबाबत पोलिसांना कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
In view of the expected arrival of PTI Chairman Imran Khan in Bani Gala, security around Bani Gala has been strengthened and placed on high alert. However, until now Islamabad Police has not received any confirmed news of return from Imran Khan's team. 1/3
— Islamabad Police (@ICT_Police) June 4, 2022
परिसरात सभेस परवानगी नाही
सुरक्षा विभागाने बनी गाला येथे विशेष सुरक्षा तैनात केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बनी गालामधील लोकांची यादी अद्याप पोलिसांना देण्यात आलेली नाही. इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू आहे आणि जिल्हा दंडाधिकार्यांच्या आदेशानुसार कोणत्याही सभेस परवानगी नाही. इम्रान खान यांना कायद्यानुसार संपूर्ण सुरक्षा पुरवली जाईल आणि इम्रान यांच्या सुरक्षा पथकानेही तेच करणे अपेक्षित आहे, असे पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
इम्रान खान यांना काही झाले तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत
दुसरीकडे, इम्रान खान यांच्यावर हल्ला झाल्यास तो पाकिस्तानवरील हल्ला मानला जाईल, असे इम्रान खान यांचे पुतणे हसन नियाझी (Hassan Niazi) यांनी म्हटले आहे. आमच्या नेत्याला काही झाले तर त्याचे परिणाम भयंकर होतील आणि षड्यंत्र रचणाऱ्यांना पश्चाताप होईल, असेही ते म्हणाले. दुसरीकडे, फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांना इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती आधीच मिळाली असून ते रविवारी इस्लामाबादला आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Corona Update : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, 24 तासांत 4270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू