Corona Update : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, 24 तासांत 4270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू
Covid-19 Update in India : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. 24 तासांत 4270 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
Covid-19 Update in India : अद्याप जग कोरोनाशी दोन हात करत आहे. अशातच भारतात कोरोना (Corona) संसर्गात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या (Covid-19) 4270 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, देशात कोरोना प्रादुर्भावापासून आतापर्यंत एकूण 5 लाख 24 हजार 692 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 2619 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 4 कोटी 31 लाख 76 हजार 817 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 24,052 इतकी आहे. तर रिकव्हरी रेट 98.73 टक्के इतका आहे. कोरोना प्रादुर्भावापासून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 4 कोटी 26 लाख 28 हजार 73 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 24 हजार 692 वर पोहोचली आहे.
देशातील कोरोनाची सध्याची आकडेवारी :
- एकूण मृत्यू : 5 लाख 24 हजार 677
- सक्रिय रुग्ण : 22 हजार 416
- कोरोनामुक्त रुग्णांची संख्या : 4 कोटी 26 लाख 28 हजार 073
- रिकवरी रेट: 98.73 टक्के
- दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट : 0.89 टक्के
- साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट : 0.77 टक्के
- कोरोना लसीकरणाची आकडेवारी : 193.96 कोटींहून अधिक
राज्यात शनिवारी 1357 कोरोना रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. काल (शनिवारी) सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. काल राज्यात 1357 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 595 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 889 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात काल कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यात काल एकूण 595 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,37,950 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.05 टक्के इतकं झालं आहे. राज्यात काल केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाांची एकूण सांख्या 78,89, 212 इतकी झाली आहे.
जूनच्या 4 दिवसांतील मुंबईतील कोविड रुग्णसंख्या मार्चच्या दुप्पट
मुंबई शहरासाठी आत्तापर्यंतची जूनची संख्या 3,095 आहे, जी मार्चमधील संपूर्ण रुग्णसंख्येच्या (1,519) च्या दुप्पट आहे, एप्रिलमधील जवळजवळ 60% रुग्णसंख्या (1,795) आणि मे महिन्यातील 50% पेक्षा (5,838) जास्त आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 60% पेक्षा जास्त रुग्णसंख्या मुंबईत आहेत, ज्यात जूनमध्ये 4,618 रुग्णसंख्या नोंदली गेली आहे. राज्याच्या संपूर्ण मे महिन्यातील 9,185 प्रकरणांपैकी 50% पेक्षा जास्त रुग्णसंख्या अधिक दर्शवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क (BMC) झाली असून उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अशातच मुंबईत चौथी लाट येणार तर नाही ना? अशी शंका तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :