एक्स्प्लोर

गूड न्यूज! कोरोनावरील लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक, मॉडर्नाच्या शेअरमध्ये उसळी

मॉडर्नाच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. सकारात्मक निष्कर्षाच्या माहितीनंतर अमेरिकी शेअर बाजारात मॉडर्नाच्या शेअरमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण जग जेरीस आलं आहे. अशातच अनेक देश या महामारीपासून बाहेर पडण्यासाठी व्हायरसवर लवकरात लवकर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक दिवस-रात्र एक करुन लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच अमेरिकेतील मॉडर्ना या औषध बनवणाऱ्या कंपनीच्या दाव्यामुळे लसीबाबतची अपेक्षा वाढवली आहे. मॉडर्नाच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत.  सकारात्मक निष्कर्षाच्या माहितीनंतर अमेरिकी शेअर बाजारात मॉडर्नाच्या शेअरमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॅशनल इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य संस्था आणि मॉडर्ना इंक यांनी मार्चमध्ये 45 निरोगी प्रौढ लोकांवर कोविड -19 लसीची चाचणी केली. या चाचणीत सहभागी लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास चांगली मदत झाली, अशी माहिती आहे. आता 27 जुलैपासून सुमारे 30 हजार लोकांवर प्रायोगिक स्तरावर लसीची मोठी चाचणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीची लस 27  जुलैपासून शेवटच्या टप्प्यात जातेय. तिच्या दुसऱ्या मानवी चाचणीचे निष्कर्ष जाहीर झालेत. लस दिलेल्या 45 लोकांमध्ये म्हणजे 100 टक्के लोकांमध्ये या लसीमुळे कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्यात. याचाच अर्थ या लशीच्या चाचणीला मोठं यश मिळालंय. सध्या जगातल्या 9 संशोधनांनी लसीच्या अभ्यासात आघाडी घेतलेली दिसतेय त्यात मॉडर्ना आणि ऑक्सफर्ड या दोन लसींच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालीय. भारतातही दोन मोठी संशोधनं सुरु आहेत. जगभरातील संशोधनांचे टप्पे पाहता 2021 ला लस लोकांपर्यंत पोहोचेल अशी आशा आहे. या लसीचा हा टप्पाही यशस्वी ठरला तर कंपनी लस बनवण्याच्या परवान्यासाठी अर्ज करु शकते. आरएनए आधारित लसीची मानवी चाचणी घेणारी मॉडर्ना ही पहिलीच औषध कंपनी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही वर्षअखेरीस कोरोनाची लस येईल, असं म्हटलं होतं. या लसीचं नाव आहे mRNA-1273. कंपनीचा दावा आहे की mRNA-1273 च्या क्लिनिकल ट्रायलमध्ये प्राथमिक चाचणीत अनेक लोकांवर लसीची चाचणी घेण्यात आली. ज्यात 8 रुग्णांच्या शरीरात चाचणीदरम्यान कोरोनाला रोखणारी अँटीबॉडी बनली. ज्याचं प्रमाण हे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात असलेल्या अँटीबॉडीएवढंच किंवा त्यापेक्षा जास्त होता. ही अँटीबॉडी किंवा इम्यून रिस्पॉन्स कोरोनाला रोखू शकते हे आम्ही सिद्ध केलं आहे, असं मॉडर्ना कंपनीचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. ताल जक्स यांनी सांगितलं. हा दावा mRNA-1273 च्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या फेरीत झालेल्या चाचणीनंतरचा आहे. कोणतीही लस तयार होण्यासाठी किमान सहा टप्पे पार करावे लागतात. * पहिला टप्पा - संशोधन * दुसरी टप्पा - प्री क्लिनिकल ट्रायल म्हणजे जनावरांवर चाचणी * तिसरी टप्पा - यामध्ये मानवावर चाचणी केली जाते. त्याचेही तीन टप्पे आहेत - 1. पहिली फेरी - 100 पेक्षा कमी माणसांवर चाचणी - 2. दुसरा फेरी - शेकडो लोकांवर चाचणी - 3. तिसरा फेरी - हजारो लोकांवर चाचणी * चौथा टप्पा - औषधाला संबंधित विभागांकडून मंजुरी * पाचवा टप्पा - उत्पादन * सहावा टप्पा - गुणवत्ता नियंत्रण जानेवारीपासून लसीवर संशोधन सुरु मॉडर्ना कंपनी जानेवारी महिन्यापासून या लसीवर संशोधन करत आहे. यासाठी लसीसाठी कंपनीने आवश्यक जेनेटिक कोड मिळवले आणि त्यानंतर माणसांवर चाचणी करण्याचा कालावधी फारच कमी दिवसात पूर्ण केला. या मानवी चाचणीसाठी ज्या 45 जणांवर परीक्षण करण्यात आलं होतं त्यांना औषधाची मात्रा देण्यात आली. या औषधाद्वारे कोरोनाविरुद्ध लढण्याची त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली दिसली. त्याच आधारावर या लसीचा मनुष्यावरील वापर सुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget