Afghanistan Crisis News: अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीनंतर पहिल्यांदाच नागरिकांना घेऊन विमानाचे उड्डाण
Afghanistan Crisis News: काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कतारचे विशेष दूत म्हणाले, "तुम्ही याला काहीही म्हणू शकता चार्टर किंवा व्यावसायिक उड्डाण. प्रत्येकाकडे तिकिटे आणि बोर्डिंग पास आहेत.
Afghanistan Crisis News: काबूलमधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर गुरुवारी जवळपास 200 गैर-अफगाण लोकांना घेऊन जाणारे एक व्यावसायिक विमानाने पहिल्यांदाच उड्डाण केले. अफगाणिस्तानातून बाहेर आलेल्या या लोकांमध्ये अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. या परदेशी नागरिकांच्या जाण्याकडे अमेरिका आणि तालिबान नेत्यांमधील समन्वयातील प्रगती म्हणून पाहिले जात आहे. तालिबानने म्हटले आहे की ते परदेशी आणि अफगाणी नागरिकांना वैध प्रवास दस्तऐवजांसह देश सोडण्याची परवानगी देईल. पण दुसर्या विमानतळावर चार्टर विमानांना होणारा विरोध पाहता तालिबानच्या आश्वासनांवर शंका निर्माण झाली आहे.
हे गुरुवारचे उड्डाण कतार एअरवेजचे असून ते दोहाला जाणार आहे. यापूर्वी कतारचे विशेष दूत मुतलक बिन माजिद अल-कहतानी यांनी सांगितले होते की, या विमानात अमेरिकन आणि पाश्चिमात्य नागरिक असतील, त्यांनी याला "ऐतिहासिक दिवस" म्हटले.
#BREAKING 200 non-Afghans to fly from Kabul on first airlift since US retreat: source in Doha pic.twitter.com/BxZX0AC4XH
— AFP News Agency (@AFP) September 9, 2021
अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना सांगितले की, सोडून गेलेले सुमारे 200 लोक अमेरिकन, ग्रीन कार्डधारक आणि जर्मनी, हंगेरी तथा कॅनडासह इतर देशांचे नागरिक आहेत. ते म्हणाले की, दोन वरिष्ठ तालिबान अधिकाऱ्यांनी परदेशी नागरिकांना बाहेर पडण्यास मदत केली.
तालिबानचे अधिकारी विमानतळावर गस्त घालत आहेत. प्रवाशांनी तपासणी दरम्यान त्यांची कागदपत्रे सादर केली आणि श्वानांनी जमिनीवर ठेवलेल्या सामानाची तपासणी केली. दरम्यान, भाग विमानतळाचे काही अनुभवी कर्मचारी नुकत्याच झालेल्या गोंधळादरम्यान कामावर परतले आहेत.
यापूर्वी कतारचे विशेष दूत मुतलाक बिन माजिद अल-कहतानी यांनी सांगितले होते की, या विमानात अमेरिकन आणि पाश्चिमात्य नागरिक असतील. त्यांनी याला "ऐतिहासिक दिवस" म्हटले. "याला तुम्ही काहीही म्हणू शकता, चार्टर किंवा व्यावसायिक उड्डाण. प्रत्येकाकडे तिकिटे आणि बोर्डिंग पास आहेत," असे आणखी एक व्यावसायिक उड्डाण शुक्रवारी होणार असे विशेष दूत यांनी सांगितले.
विशेष दूत म्हणाले, "आशा आहे की अफगाणिस्तानात आयुष्य सामान्य होईल, ते म्हणाले की विमानतळाचे रडार आता सक्रिय आहे आणि सुमारे 70 मैल (112 किमी) अंतर व्यापत आहे. ते म्हणाले की, अधिकारी पाकिस्तानशी समन्वय साधत आहेत.