मुस्लिम देश गप्प राहून तमाशा बघतायेत, अमेरिका कोणत्याही देशाचा नाश करु शकते, फारुख अब्दुल्लांचं मोठं वक्तव्य
अमेरिकेनं इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Farooq Abdullah on Israel Iran War : अमेरिकेनं इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. इस्रायलवर हल्ला झाला पण जगातील सर्व मुस्लिम देश गप्प आहेत. ते शांत बसून तमाशा पाहत आहेत. मी या गोष्टीमुळं निराश झाल्याचे अब्दुल्ला म्हणाले. आज इराणची अशीच अवस्था आहे, उद्या इतर देशांवरही अशीच परिस्थिती येऊ शकते. अमेरिका कोणत्याही देशाचा नाश करु शकते. जर मुस्लिम देश आज जागे झाले नाहीत तर असे अब्दुल्ला म्हणाले.
इराण कधीही झुकवणार नाही
अमेरिकेला जर वाटत असेल की इराण शस्त्रे सोडेल, तर ते चुकीचे आहे. इराणला त्यांची मान कापावी लागली तरी चालेल, पण ते मान झुकवणार नाही असे फारुख अब्दुल्ला म्हणाले. इराणमध्ये सत्ता बदल हवा आहे. अमेरिका आणि इस्रायलचा बराच काळ असा विश्वास होता की ते इराणला अण्वस्त्रे विकसित करु देणार नाहीत. पण जर त्यांना असे वाटत असेल की इराण आपली महत्त्वाकांक्षा सोडून देईल तर ते चुकीचे आहे असंही अब्दुल्ला म्हणाले. तसेच मुस्लिम देशांच्या मौनामुळे मी निराश झालो असल्याचेही ते म्हणाले.
'डोनाल्ड ट्रम्प तिसरे महायुद्ध सुरु करू इच्छितात
फारुक अब्दुल्ला यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष इराण-इस्रायल युद्धात रस घेत आहेत. ज्याच्याकडून आपण हस्तक्षेप करुन युद्ध थांबवण्याची अपेक्षा करु शकतो. ते स्वतः हल्ला करत आहे. हे अमेरिकेचे दुसरे युद्ध आहे. ते आधीच रशियाशी लढत आहे. याचा अर्थ अमेरिका तिसऱ्या महायुद्धाकडे जात असेही अब्दुल्ला म्हणाले.
#WATCH | Srinagar | "I am disappointed that the Muslim world is silent. Today, Iran is in this condition, but tomorrow, it will be them who will be destroyed by the US. If they won't wake up today, they must wait for their turn, "says National Conference chief Farooq Abdullah on… pic.twitter.com/pLvbEcWWha
— ANI (@ANI) June 22, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी मला माहित
फारुक अब्दुल्ला म्हणाले, की, आता काय होईल कोणाला माहित आहे? काहीही सांगू शकत नाही. ट्रम्प यांनी नुकतेच पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांना जेवणासाठी आमंत्रित केले आहे. त्यांना परेडमध्ये पाहुणे म्हणून निवडण्यात आले आहे. ते कोणता खेळ खेळत आहेत हे मला माहित नाही. एकीकडे त्यांच्या हातात भारत आहे आणि दुसरीकडे पाकिस्तान देखील आहे. त्यांना काय करायचे आहे हे कोणाला माहित? असा सवाल देखील फारुक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
























