एक्स्प्लोर

Pakistan on US attacks: अमेरिकेचा 'ब्लू आईड बॉय' झालेल्या पाकिस्तानची इराणमधील हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया, शाहबाज शरीफ म्हणाले...

Pakistan condemns US attacks: अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर केलेल्या हल्ल्यांबद्दल पाकिस्तानने तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि लष्करी हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.

Pakistan condemns US attacks: पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या तीन प्रमुख आण्विक तळांवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांचा तीव्र निषेध करत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, इराणच्या सार्वभौमत्वावर झालेला हा हल्ला प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी गंभीर धोका आहे.  इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांबद्दल पाकिस्तानने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, हे हल्ले आधीच सुरू असलेल्या इस्रायली कारवायांचा एक भाग आहेत आणि यामुळे या प्रदेशात तणाव आणि हिंसाचार आणखी वाढू शकतो. ही परिस्थिती केवळ मध्य पूर्वेतीलच नव्हे तर संपूर्ण जगाच्या शांतता आणि स्थैर्यासाठी धोकादायक आहे असे पाकिस्तानचे मत आहे.

पाकिस्तानने स्पष्टपणे म्हटले आहे की, या हल्ल्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे सर्व नियम आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन केले आहे. इराणला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्यावरील असे हल्ले कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाहीत. हे आंतरराष्ट्रीय नियमांविरुद्ध एक धोकादायक पाऊल आहे. निवेदनात, पाकिस्तानने सर्व देशांना सामान्य नागरिकांच्या जीविताचा आणि मालमत्तेचा आदर करण्याचे आणि युद्धासारख्या कृती त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सर्व पक्षांना आंतरराष्ट्रीय कायद्यांचे, विशेषतः मानवाधिकार कायद्याचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाकिस्तानने यावर भर दिला की सध्याच्या संकटावर संवाद आणि राजनैतिक चर्चाद्वारेच तोडगा काढणे शक्य आहे आणि त्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

डोनाल्ड ट्रम्प वॉर रुममध्ये बसून सगळं पाहत होते

इराणविरुद्धच्या इस्रायलच्या युद्धात अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की अमेरिकेने इराणच्या तिन्ही अणुस्थळांना नष्ट केले आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, जेव्हा अमेरिकन सैन्याने इराणवर हवाई हल्ला केला तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासह वॉर रूममध्ये उपस्थित होते आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. रविवारी सकाळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टद्वारे इराणच्या तीन अणुस्थळांवर झालेल्या हल्ल्यांची माहिती दिली. ते म्हणाले, "सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत आणि सुरक्षितपणे घरी परतत आहेत.फोर्डो नावाच्या जागेवर सर्वाधिक बॉम्ब टाकण्यात आले." राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याचे कौतुक केले आणि म्हटले, "आमच्या महान योद्ध्यांचे अभिनंदन! जगातील इतर कोणतेही सैन्य हे करू शकत नाही." यासोबतच त्यांनी म्हटले की आता शांततेचा काळ आहे. तर, या हल्ल्यावर इराणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget