Emirates Airlines Security Lapse : भारताकडे येणाऱ्या दोन विमानांचा मोठा अपघात टळला, शेकडो प्रवाशांचा वाचला जीव
Dubai International Airport : युएईतून भारताकडे येणारी दोन विमाने पाच पाच मिनिटांच्या अंतराने एकाच रनवेवर (धावपट्टीवर) टेक-ऑफसाठी नियोजित होती.
Dubai International Airport : दुबईवरुन भारताकडे येणाऱ्या दोन विमानांचा मोठा अपघात टळला आहे. दोन विमाने एकाच रनवेवर आल्यामुळे मोठा अपघात होता होता वाचला आहे. यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचला आहे. 9 जानेवारी 2021 रोजी रात्री ही घटना घडल्याचं समोर आले आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या दुर्घटनेशी निगडीत UAE च्या Aviation Investigations Body ने भारताशी निगडीत दोन विमानांच्या अपघातासंदर्भात चौकशी सुरु केली आहे. (Collision between two India-bound flights averted in UAE )
युएईतून भारताकडे येणारी दोन विमाने पाच पाच मिनिटांच्या अंतराने एकाच रनवेवर (धावपट्टीवर) टेक-ऑफसाठी नियोजित होती. 9 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. या विमानांनी जर या नियोजित वेळेनुसार उड्डाणे घेतली असती तर मोठ्या अपघाताची शक्यता होती. मात्र, ATC ने वेळीच टेक ऑफ नाकारले अन् शेकडो जणांचे जीव वाचले आहेत.
काय आहे प्रकरण?
9 तारखेला रात्री 9:45 वाजता दुबई-हैदराबाद येथून EK-524 विमान रनवे 30R वरून टेक-ऑफसाठी वेग घेत होते. तेव्हाच चालकांनी त्याच दिशेने वेगाने विमान येताना पाहिले. हे दुसरे विमान दुबईहून बंगळुरुला जाणारडे एमिरेट्स फ्लाइट EK-568 होते. हे सर्व पाहाता एटीसीने तात्काळ टेक ऑफ नाकारण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे विमानाचा वेग सुरक्षितपणे खाली आला आणि टॅक्सीवे N4 द्वारे धावपट्टी मोकळी करण्यात आली. भारताशी निगडीत दोन विमानांच्या अपघातासंदर्भात चौकशी सुरु केली आहे. दोन्ही विमानातील क्रूचीही चौकशी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- कोव्हिड सेल्फ टेस्टिंगबाबत मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी, लपवाछपवी रोखण्यासाठी पालिकेची नियमावली
- मुंबईतील रोजच्या कोरोना रुग्ण संख्या चढ-उताराचा निष्कर्ष नेमका काय काढायचा?
- कोरोना निर्बंधाचा विमानसेवेला फटका, औरंगाबादमध्ये गेल्या पंधरा दिवसात 33 विमानांचे उड्डाण रद्द
- Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा घट्ट होतोय! राज्यात आज 43 हजार 211 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद