Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा घट्ट होतोय! राज्यात आज 43 हजार 211 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Update : राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के झाला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची भर झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 33, 356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात 228 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 238 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1605 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 859 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 19 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे. सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9286 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,15,64,070 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 11 हजार 317 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
मागील 24 तासांत 11 हजार 318 नवे कोरोनाबाधित सापडले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. पण रुग्णसंख्या 10 हजारांहून अधिक असल्याने धोका कायम आहे. ज्यामुळे योग्य काळजी घेऊन नियम पाळणं महत्त्वाचं झालं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गुरुवारी 22 हजार 73 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट एका टक्क्याने वाढून 89 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच मागील 24 तासांत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 435 झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- कोव्हिड सेल्फ टेस्टिंगबाबत मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी, लपवाछपवी रोखण्यासाठी पालिकेची नियमावली
- मुंबईतील रोजच्या कोरोना रुग्ण संख्या चढ-उताराचा निष्कर्ष नेमका काय काढायचा?
- कोरोना निर्बंधाचा विमानसेवेला फटका, औरंगाबादमध्ये गेल्या पंधरा दिवसात 33 विमानांचे उड्डाण रद्द