(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Elon Musk on Twitter : पत्नीच्या दबावापोटी इलॉन मस्क यांनी घेतला होता ट्विटर खरेदीचा निर्णय
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क (Elon Musk) यांनी पत्नीच्या दबावापोटी इलॉन मस्क खरेदीचा निर्णय घेतला होता.
Elon Musk on Twitter : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क (Elon Musk) हे पुन्हा ट्विटर (Twitter) खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं इलॉन मस्क आणि ट्विटरमधील संघर्षाला आता एक वेगळे वळण लागलं आहे. मस्क यांची पहिली पत्नी तल्लुलाह रिले यांनी ट्विटरसोबत करार करण्यासाठी दबाव आणला होता अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, ट्विटरसोबतच्या कायदेशीर लढाईसंदर्भात मस्क यांनी कोर्टात दाखल केलेली माहिती आता उघड झाली आहे.
खटल्याची पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला
दरम्यान, एप्रिल महिन्यात इलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, हा व्यवहार नंतर मध्येच बारगळला. या किंमतीवर हा करार करण्यासाठी ट्विटरचीही तयारी असल्याचे बोलले जात आहे. करारातून मस्क यांनी अचानक माघार घेतल्यानंतर ट्विटरने डेलावेअर चांसरी न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या 17 ऑक्टोबरला होणार आहे. ट्विटरवर इलॉन मस्क यांची मालकी नाही. ते ट्विटर कधी खरेदी करणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मस्क यांच्या वकिलांनी ट्विटरला एक पत्र पाठवले आहे. ट्विटरने डेलावेअर चांसरी न्यायालयात मस्क यांच्या विरोधात दाखल खटला मागे घेतल्यास आणि आश्वासनानुसार वित्त पुरवठ्याची तजवीज झाल्यास इलॉन हा व्यवहार करतील अशी माहिती या पत्रात दिली आहे. मस्क यांच्यासोबतचा हा करार वास्तविकरित्या शक्य आहे, याची खात्री पटल्यावर ट्विटरकडून हा खटला मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.
इलॉन मस्क यांनी एप्रिल महिन्यात तब्बल 44 अब्ज डॉलर एवढी प्रचंड रक्कम खर्चून ट्विटर खरेदी करत असल्याचे यांनी जाहीर केले होते. ट्विटरच्या संचालक मंडळानेसुद्धा या व्यवहाराला मंजुरी दिली होती. मात्र, ट्विटरवरील बनावट खात्यांची पुरेशी माहिती कंपनी देत नाही, हे कारण देत त्यांनी हा व्यवहार रद्द केला होता. आता पुन्हा इलॉन मस्क ट्विटरवर सुरू असलेल्या कायदेशीर लढाई दरम्यान काहीतरी मोठे करण्याची तयारी करत असल्याची देखील माहिती मिळाली होती.
दरम्यान, मस्क यांच्या नव्या प्रस्तावाबाबत खात्री न पटल्यास 17 ऑक्टोबरला होणारी सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते. ट्विटरला १०० टक्के खात्री झाल्याशिवाय कोर्टातील हे प्रकरण ट्विटर मागे घेणार नसल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Elon Musk : एलॉन मस्क ट्विटर खरेदी करणार? खटल्यावरील सुनावणी आधी मस्क यांच्याकडून ट्विटरला ऑफर